चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार अभिनय करतात. आपल्या अभिनयाने ते लोकांचे मन जिंकून घेतात. बॉलिवूड मध्ये असेही काही कलाकार होऊन गेले ज्यांनी आजही त्यांच्या चाहत्यांच्या मनात घर केले आहे. प्रत्येक प्रेक्षकांचा कोणी ना कोणी आवडता अभिनेता, अभिनेत्री असतेच. तुम्हालाही कोणी हिरो हिरोईन आवडतच असणार यात शंका नाही … आपली फिल्म इंडस्ट्रीत अपार कष्ट करून पुढे आलेला सगळ्यांचा चाहता शाहरुख खान. याच्या अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतो. ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आठवणीत असेलच.
१९९८ मध्ये हा सिनेमा आला, चित्रपट खूप सुपरहिट झाला होता. यामध्ये शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जी हे प्रमुख कलाकार होते आणि यांच्यात अजून एक कलाकार मुख्य होती ती म्हणजे अंजली जी शाहरुख खानची मुलगी दाखवली होती. तेव्हा ती ८-९ वर्षाची होती. कमी वयातच तिने या चित्रपटात काम करून अनेक लोकांची मने जिंकली. एका चुलबुली मुलीची भूमिका तिने पार पाडली, तिचे अभिनय लोकांना खूप आवडला त्यामुळे तिचे विशेष कौतुक देखील करण्यात आले होते. या चित्रपटानंतर तिला काही ऑफर्स आल्या होत्या, तिने त्यात काम सुद्धा केलं. नंतर काही कालावधी नंतर ती फिल्म इंडस्ट्री पासून दूर गेली तर ती आता सध्या काय करते.. हे पाहूया ..
छोट्या अंजली ची भूमिका पार पाडणारी अभिनेत्रीचा जन्म २२ सप्टेंबर १९८८ साली मुंबई मध्ये झाला असून सना सईद अस तिचं नाव आहे. एक बालकलाकार म्हणून अंजलीची भूमिका तिने कुछ कुछ होता है मध्ये स्वीकारल्यानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली, तसेच त्यानंतरही तिने बादल, हर दिल जो प्यार करेगा चित्रपटांतही काम केले . त्यानंतर बराच काळ ती पडद्यावर दिसली नाही. मग ‘स्टूडेंट ऑफ द इअर’ या चित्रपटात एका बोल्ड भूमिका करून लोकाचे पुन्हा एकदा मन जिंकलं. २०१२ मध्ये हा चित्रपट आला होता, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रा आणि आलिया भट्ट यांच्यासोबतच ती एका मुख्य भूमिकेत दिसून आली. सना ने काही टेलिव्हिजन शो ही केले आहेत.
बाबुल का आंगन छुटे ना, लाल इश्क, कॉमेडी सर्कस, लो हो गयी पूजा इस घर की अशा हिंदी मालिकांमध्ये ही काम तिने केले. तसेच काही रियालिटी शो जसे की झलक दिखला जा, नच बलिये, खतरों के खिलाडी ह्या मध्ये ही काम केले आहे. वर्ष २००८ मध्ये ‘जज्बात’ मालिकेत होती.सना आता खूपच छान आणि क्युट दिसते. ती एक उत्तम डान्सर सुद्धा आहे . ती आता आपल्या करिअर कडे लक्ष केंद्रीत करत आहे. आजसुद्धा बोल्ड आणि ग्लॅमरस दिसणारी सना सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो, अपडेट्स शेअर करत असते. ती आता सध्या ‘स्ट्रेन्जर ग्रुप’ या चित्रपटात काम करत आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकासमोर प्रदर्शित होईल.
आपली सगळ्यांची आवडती छोटी अंजली म्हणजेच सना सईद हिला यश मिळू दे आणि प्रगती होऊ दे… पावलोपावली अशीच संधी मिळत राहो. तिला तिच्या भावी जीवनासाठी कलाकार.इन्फो टीमतर्फे खूप शुभेच्छा! तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारा नक्की कळवा. हा लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.