महाराष्ट्र शाहीर या चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त केदार शिंदे विविध माध्यमातून मुलाखती देत आहेत. सोबतच चित्रपटाची नायिका सना आणि अंकुश देखील चित्रपटाच्या आणि अजून काही जुन्या आठवणी सांगताना दिसला. केदार आणि अंकुश हे कॉलेज पासूनचे मित्र. बारावीत शिकत असताना त्याने सहज म्हणून अंकुशला लोकधारामध्ये डान्स करणार का? असा प्रश्न विचारला होता. तेव्हा अंकुश हो म्हणाला. कारण अंकुशच्या घरच्यांना सुद्धा माहीत होतं की तो डॉक्टर किंवा अजून मोठा काही होणार नाही. पण आपल्या मुलाने किमान बँकेत तरी नोकरी करावी अशी त्यांची अपेक्षा होती मात्र अंकुशने केदारचा प्रस्ताव स्वीकारला.
आमच्या बरोबर असणारे बरीचशी मुलं हे क्षेत्र सोडून नोकरीला लागले. त्यांनाही या क्षेत्रात येण्याची इच्छा होती असे अंकुश आवर्जून म्हणाला. याच मुलाखतीत केदारला घरच्यांचा कधी मार खाल्ला आहे का? असा प्रश्न विचारला तेव्हा त्याने हो असे उत्तर दिले. पुढे केदार म्हणतो की, लोकधारामध्ये आम्हाला पैसे मिळायचे, मला १५ रुपये आणि अंकुशला १० रुपये. त्यावेळी मायकल जॅक्सन रॉ स्टार नावाचे शूज घालायचा. या ओरिजनल शूज किंमत खूप जास्त होती. मोहम्मद अली रोडवर त्याचे डुप्लिकेट शूज ४०० रुपयाला मिळायचे, पण दिसायचे अगदी सेमच. त्यावेळी प्रयोग करून मी जवळपास ४५० रुपये जमवले होते. कोणालाही न सांगता मी ते शूज विकत घेतले होते. घरी गेल्यावर बाबांनी प्रश्न विचारला की, कुठे गेला होतास?
तेव्हा मी सांगितलं की बूट घ्यायला गेलो होतो. मी दाखवले ते बूट तर त्याच बुटाने मला त्यांनी मारलं होतं. तुझी हिंमत कशी झाली? तुझी लायकी आहे का ४०० रुपयाचे शूज तू पायात कसा घालू शकतोस? असे म्हणून त्यांनी मला मारलं होतं. त्याच बाजूला माझी मुलगा सना जेव्हा ३००० चे शूज घेऊन येते तेव्हा मी तिला सांगतो की मी ४०० रुपयासाठी मार खाल्लाय. तेव्हा सना म्हणते की, मी आता कुठलीही गोष्ट आणली आणि बाबांना दाखवली की ते कधीच किंमत विचारत नाहीत. कारण त्यांना पाहूनच समजतं की त्याची किंमत खूप जास्त असणार. यावर केदार शिंदे म्हणतात की, ह्यातून मी काय गोष्ट शिकलो की तुझी ती योग्यता येऊ दे तेव्हा ती गोष्ट घेण्यामध्ये गंमत आहे. योग्यतेच्या अगोदर नाही.
दरम्यान महाराष्ट्र शाहीर चित्रपटानिमित्त कलाकार मंडळी चित्रपट गृहात जाऊन प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहेत. अंकुशने तर तिकीट बारीवर प्रेक्षकांना तिकीट सुद्धा विकली आहेत. प्रेक्षकांचा हा प्रतिसाद आणि त्यांच्याशी होत असलेला सुसंवाद व्हायरल होत आहे. सोबतच चित्रपट आवडला असल्याच्या भरभरून प्रतिक्रिया अंकुशला मिळत आहेत. अंकुश आणि सना यांच्या अभिनयात अजय अतुल यांचे सुमधुर पार्श्वसंगीताची गोडी चित्रपटाच्या यशात आणखीन भर घालत आहे.