Breaking News
Home / मराठी तडका / एका क्षणाला वाटलं होतं सोडून द्यावं सगळं.. हृताने सांगितला अनुभव
hruta durgule upcoming movie
hruta durgule upcoming movie

एका क्षणाला वाटलं होतं सोडून द्यावं सगळं.. हृताने सांगितला अनुभव

​​मराठी सृष्टीतील लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे एकामागोमाग येणाऱ्या दोन चित्रपटातून झळकणार आहे. टाईम​​पास ३ आणि अनन्या हे तिचे आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. हृताचा अनन्या हा चित्रपट येत्या २२ जुलै​​ रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे त्यामुळे हृता या चित्रपटाबद्दल खूपच उत्सुक आहे. अनन्या या असाधारण मुलीची ही गोष्ट आहे जिने एका अपघातामध्ये आपले दोन्ही हात गमावले आहेत. अनन्याचा जगण्याचा संघर्ष हृताने साकारताना मोठी मेहनत घेतली आहे. ही मेहनत घेत असताना ती कधी कधी रडली देखील. चित्रपटासाठी तिला व्यायाम करावा लागायचा. हातच नसल्याने चमच्याने खाणे, केस विंचरणे ह्या सर्व ऍक्टिव्हिटी तिला कराव्या लागायच्या.

hruta durgule upcoming movie
hruta durgule upcoming movie

हा सराव करत असताना तिला या गोष्टीची इतकी सवय होऊन गेली की सेटवर गेल्यावरही ती अगोदर पाय पुढे करायची. ह्या सर्व गोष्टी करत असताना पायाच्या दोन बोटांमध्ये तेवढाच गॅप आपोआप जाणवू लागला. असा एक क्षण येतो ज्यावेळी वाटतं हे सगळं सोडून द्यावं. त्याक्षणी जर तुम्ही लढलात की तुम्ही सर्व गोष्टी जिंकु शकता. तुम्हाला हातच नाहीयेत मग कुठला पर्यायच नसेल तर कसं करणार. या विचारात असताना त्यावेळी मी ठरवलं की मी ही गोष्ट करू शकते. अनन्या, टाईमपास ३ या चित्रपटामुळे मालिकेत आणि नाटकात काम करता येत नव्हतं. मन उडू उडू झालं या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र असे असूनही केवळ हृताला वेळ मिळत नसल्याने मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे.

hruta durgule ananya movie
hruta durgule ananya movie

लवकरच दिपू आणि इंद्राचे लग्न होणार असा गोड शेवट दाखवून मालिका संपणार आहे. आजच मालिकेचा अखेरच्या दिवसाचे शूटिंग पूर्ण करण्यात आले. त्यावेळी सर्व कलाकारांनी हा क्षण एकत्र येऊन साजरा केलेला पाहायला मिळाला. मालिकेतील इंद्रा म्हणजेच अजिंक्य राऊत हा देखील चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या दोन्ही मुख्य कलाकारांची वेळ ऍडजस्ट होत नसल्याने निर्मात्याने मालिका आटोपती घेण्यावर अधिक भर दिला. हृता चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असल्याने तिला मालिकेतून फारसे दाखवले जात नव्हते. ही सर्व जबाबदारी अजिंक्यने जास्त पेलली होती. अनन्या चित्रपटासाठी तिने घेतलेली मेहनत निश्चितच फळाला येईल अशी अपेक्षा आहे. या चित्रपटासाठी हृताला खूप खूप शुभेच्छा.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.