बिगबॉस मराठी तिसऱ्या सिझनच्या रोजच्या घडामोडी खूपच रंजक होत चालल्या आहेत. दर आठवड्यात स्पर्धकांमध्ये विविध टास्कमधून दमदार परफॉर्मन्स देत असले तरीही घरातील कामाच्या वाटपावरून नेहमीच वादावादी होत आली आहे. सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यातील जोरदार भांडणानंतर आता सोनालीने मीराला सणसणीत उत्तरात धारेवर धरत चांगलीच फजिती केल्याचे मिम प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आहेत..
घरातील कामांवरून अगोदर झालेल्या वादात तृप्ती देसाईने सोनालीला दम भरला होता पण सोनालीने लगेच सडेतोड उत्तर देत तृप्तीला शांत केले होते.. “महिलांनाच विरोध करायला ह्या कायम पुढे.. महिला.. महिला.. महिला आणि भांडायला नंबर पहिला !” अशा मजेशीर उत्तराने नेटकऱ्यांनी मिम द्वारे तृप्तीला खरपूस ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. आता काहीशी अशीच मिम मीरा आणि सोनालीच्या भांडणात तयार होत आहेत. “सोनालीला स्वतःचं काही म्हणणं नसतं, ती दुसऱ्याचं ऐकून बोलते. कुठल्याही टास्क मध्ये नीट दिसत नाही, बोलताना कॉन्फिडन्स दिसत नाही..” मीराच्या या तक्रारीवर सोनालीने अफलातून प्रतिक्रिया दिली आहे.. “अरे हे काय, मला जेव्हा बोलायचं तेव्हा मी बोलतेच.. तु काय मेजरमेंट आणलंय कॉन्फिडन्स मोजायचं !” या सणसणीत उत्तरावर नेटकरी ट्रोल करीत आहेत.
सोनाली तिच्या मजेशीर प्रतिक्रिया आणि टास्क मधून दमदार खेळी चांगली परफॉर्मर असल्याची खात्री देते, तूर्तास तरी ती प्रेक्षकांच्या अपेक्षांना पात्र ठरत आहे. बिग बॉसच्या घराबाहेर पडलेल्या सुरेख कुडची यांनी एका मुलाखतीत सोनाली सोबत एखाद्या सीरिअल मध्ये सासू सुनेचा रोल करायला आवडेल असे गमतीदार उत्तर दिले आहे. मनोरंजनासाठी ब्रेड बटर मिळणार असेल तर माझी हरकत नाही असेही त्या म्हणाल्या. आता सोनाली आणि मीरा यांच्यातील हा नवा वाद इथेच संपतो की तो घरातील वातावरण तापविणार हे पुढील भागात पहायला मिळणार आहे.