Breaking News
Home / बॉलिवूड / हा हॅंडसम मराठमोळा कलाकार नुकताच झाला विवाहबद्ध…
disha parmar wedding photos
disha parmar wedding photos

हा हॅंडसम मराठमोळा कलाकार नुकताच झाला विवाहबद्ध…

इंडियन आयडॉल च्या पहिल्याच सिजनचा सेकंड रनर अप ठरलेला मराठमोळा कलाकार “राहुल वैद्य” आज शुक्रवार १६ जुलै २०२१ रोजी विवाहबद्ध झाला आहे. हिंदी मालिका अभिनेत्री दिशा परमार हिच्याशी त्याने आज विवाह केला असून गेल्या कित्येक दिवसांपासून या कपलची चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत होती. गेल्या दोन दिवसांपासून राहुल वैद्य आणि दिशा परमार यांच्या लग्नाची जोरदार तयारी पाहायला मिळाली होती. संगीत सोहळा, हळद आणि मेहेंदी सोहळ्याचे क्षण दिशाने सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले होते.

rahul with disha lovely couple
rahul with disha lovely couple

राहुल वैद्य आणि दिशा परमार या दोघांची ओळख त्याच्याच एका अलबममधून झाली होती. राहुल वैद्य हा मूळचा नागपूरचा परंतु वडील मुंबईत कामानिमित्त आले आणि इथेच स्थायिक झाले. राहुलचे शिक्षण देखील मुंबईतच झाले असून मिठीबाई कॉलेजमध्ये त्याने पदवीचे शिक्षण घेतले आहे. लहानपणापासूनच राहुलला गाण्याची विशेष आवड होती. १९९७ साली पहिल्यांदा तो स्टार यार कलाकार या शोमध्ये झळकला होता त्यानंतर अंताक्षरी सारख्या शोमध्येही त्याने सहभाग दर्शवला मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती इंडियन आयडल च्या पहिल्या सिजनमुळे. इंडियन आयडलचा पहिला शो २००४ साली रिलीज झाला होता त्यात राहुलने पार्टीसिपेट केले होते. या सिजनमध्ये तो सेकंड रनर अप ठरला होता. इथूनच त्याच्या गाण्याला खरा वाव मिळत गेला.

rahul vaidya disha parmar wedding
rahul vaidya disha parmar wedding

हिंदी चित्रपट गीते, अल्बम साकारून तो बराच काळापासून या झगमगत्या दुनियेत आपले स्थान कायम टीकवून ठेवताना दिसला. बिग बॉसच्या १४ व्या सिजनमध्येही तो बिग बॉसच्या घरात प्रेक्षकांचे मनोरंजन करत राहिला होता. याच घरात असताना राहुलने अभिनेत्री दिशा परमारला प्रपोज केले होते. त्यानंतर या दोघांच्या प्रेमाची चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत गेली. दिशा परमार ने प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा, वो अपना सा या हिंदी मालिकेतून प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. राहुल वैद्यच्या अल्बममध्येही ती झळकली असल्याने या दोघांची तेव्हापासूनच ओळख होती. आज १६ जुलै रोजी हे दोघेही विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाची धामधूम सोशल मीडियावर सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

त्यांच्या या लग्नसोहळ्याचे क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असून सोशल मीडियावर ते त्यांच्या चाहत्यांना पाहायला मिळत आहेत. आमच्या Kalakar. info समूहातर्फे राहुल वैद्य आणि दिशा परमार या नवदाम्पत्यास विवाहाच्या भरघोस शुभेच्छा आणि त्यांचे खूप खूप अभिनंदन!!!….

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.