Breaking News
Home / मराठी तडका / “सैराट” फेम परशा आता करत आहे हे काम, पिळदार शरीरयष्टी मुळे दिसतोय खूपच हँडसम…..
aakash thosar upcoming movie
aakash thosar upcoming movie

“सैराट” फेम परशा आता करत आहे हे काम, पिळदार शरीरयष्टी मुळे दिसतोय खूपच हँडसम…..

मित्रहो मराठी चित्रपट सृष्टीत इतिहास घडवणारा चित्रपट म्हणजे ” सैराट “,  या चित्रपटाने मराठीच न्हवे तर बॉलिवूड मध्ये देखील धुमाकूळ घातला आहे. अनेक उत्कृष्ट कलाकार हा चित्रपट पाहुन थक्क झाले आहेत. यातील कला आणि कलाकार हे सगळेच अतुलनीय आहेत. रातोरात हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट झाला आहे त्यामुळे याची चर्चा आजही तितकीच रंगात येते जेवढी सुरुवातीला होती. यातील सर्व कलाकारांना प्रचंड लोकप्रियता लाभली आहे, खरेतर याचे सर्व श्रेय नागराज मंजुळे यांना जाते कारण चित्रपटासाठी त्यांनी कोणत्याही स्टारला न घेता सामान्य कलाकारांना संधी दिली आणि त्यातही कौतुकास्पद म्हणजे त्या सामान्य कलाकारांनी असामान्य कला सादर केली.

सैराट मधील प्रत्येक गोष्ट चर्चेत आली आहे, रस्त्यावरचा तो आरसा , ट्रॅक्टर, नदी, विहीर, गाणी, बुलेट, खो खो, शेत, अगदी सगळं काही प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. यातील प्रत्येक गोष्ट साधी होती पण ती पडद्यावर दिसल्याने तीचे मूल्य वाढले. सामान्य लोक , सामान्य कथा, सामान्य गोष्टी यातून नागराज मंजुळे यांनी असामान्य चित्रपट प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात आर्ची आणि परशा हे दोघे विशेष चर्चेत आले आहेत. या दोघांच्याही आयुष्याला एक नवी दिशा मिळाली आहे जी त्यांना यश गाठण्यास मदत करेल. आज आपण सैराट फेम परशा म्हणजेच आकाश ठोसर याच्याबद्दल खास माहिती जाणून घेणार आहोत. आकाश ने कधीच असा विचार केला न्हवता की तो कधी पडद्यावर झळकेल. सैराट मुळे तो पडद्यावर दिसला आणि बघता बघता अनेकांच्या मनात आला.

aakash thosar parsha body building
aakash thosar parsha body building

 

आकाश ने सैराट चित्रपटातून भरपूर लोकप्रियता मिळवली, त्यातील त्याचा अभिनय उत्कृष्ट आहे त्यामुळे त्याच्या अभिनयावर आणि त्याच्या लुक वर हजारो मुली फिदा आहेत. सैराट मध्ये आकाश खूप सडपातळ दिसत आहे पण आता मात्र आकाशने आपली शरीरयष्टी बळकट बनवली आहे आणि तो आणखीन हँडसम दिसत आहे. आकाश ने सैराट मध्ये मिळालेल्या यशानंतर पुढे याच क्षेत्रात कार्यरत राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आपला अभिनय क्षेत्रातला प्रवास सुरु ठेवत “एफ यु: फ्रेंडशिप अनलिमिटेड” २०१७ मध्ये हा चित्रपट केला होता. तसेच २०१८ मध्ये “लस्ट स्टोरीज “, २०२० मध्ये ” झुंड ” या हिंदी चित्रपटात काम केले आहे. तसेच “१९६२ : द वार इन द हिल्स ” या वेबसेरीज मध्ये काम केले आहे.

नागराज मंजुळे यांचा हा “झुंड” चित्रपट आकाश साठी खूप आनंद मिळवून देणारा आहे, यामध्ये आकाशला त्याचे आवडते कलाकार अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. आकाश ठोसर हा चित्रपटात सडपातळ दिसला असला तरी त्याचा तो लुक चित्रपटासाठी बनवला होता, तो चित्रपटात येण्यापूर्वी कुस्ती खेळत होता.  त्यामुळे त्याला व्यायामाची खूप आवड आहे. जरी चित्रपटात त्याला वजन कमी करण्यासाठी सांगितले असले तरीही त्याने आपली व्यायामाची आवड जपली आहे, तो नेहमीच जिम मधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो आणि आता व्यायाम केल्यामुळे त्याची शरीरयष्टी खूपच पिळदार आणि आकर्षक बनली आहे. ज्यामुळे तरुणी आधीपेक्षा जास्त त्याच्यावर फिदा आहेत.

aakash thosar new movie
aakash thosar new movie

आकाश हा चित्रपट सृष्टीत नवीन कलाकार असून त्याने कमी वेळेत जास्त मने जिंकली आहेत. त्याला आतापर्यंत खूपशा सिनेमात पाहिले गेले आहे आणि इथून पुढे सुद्धा त्याला अनेक चित्रपटात आपणाला पाहण्याची संधी मिळू शकते. सध्या तरी तो त्याच्या हँडसम लुक मुळे तरुणींच्या घोळक्यात चर्चेचा विषय बनत आहे आणि तो लवकरच पुन्हा पडद्यावर दिसेल. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आम्ही पुन्हा असेच  मनोरंजक लेख तुमच्यासाठी लिहित राहू.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.