Breaking News
Home / बॉलिवूड / बॉलिवूड मधील हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक एका चित्रपटासाठी घेतात कोटीच्या कोटी रुपये, एकाने तर घेतली एवढी रक्कम की ऐकूनच डोळे पांढरे होतील…
bollywood famous directorsbollywood famous directors
bollywood famous directors

बॉलिवूड मधील हे सुप्रसिद्ध दिग्दर्शक एका चित्रपटासाठी घेतात कोटीच्या कोटी रुपये, एकाने तर घेतली एवढी रक्कम की ऐकूनच डोळे पांढरे होतील…

बॉलिवूडमध्ये प्रत्येक कलाकाराकडे एक वेगळी, निराळी कला आहे, सर्वच जण फक्त अभिनय करणारे नसून, नृत्य , शूट , चित्रपट दिग्दर्शन , गायक, गीतकार, लेखक, संगीतकार, संगीत दिग्दर्शक, हजारो लहान थोर आर्टिस्ट, स्टंटमॅन, कॅमेरामन अशा भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे काम करणारे उपस्थित आहेत. चित्रपट बनवण्यासाठी एक टीम बनून काम करावं लागतं तेव्हा कुठे उत्कृष्ट चित्रपट निर्माण होतो. या टीम मधील प्रत्येक जण आपापल्या परीने उत्कृष्ट काम करत असतो त्यामुळे बॉलिवूड मधील चित्रपट तुलनेने खूप छान वाटतात.

हल्ली चित्रपट देखील बिग बजेटचे तयार होत आहेत, त्यामुळे अभिनय साकारणारे अभिनेते, अभिनेत्री यांचे मानधन देखील दुपटी तिपटीने वाढले आहे. इंडस्ट्रीमध्ये काही दिग्दर्शक सुद्धा असे आहेत की ज्यांचे मानधन आपल्या कल्पना शक्तीपलीकडचे आहे. गेल्या काही वर्षात भरपूर ब्लॉक बस्टर चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, या चित्रपटांचे हजारो कोटींचे बजेट ऐकले तर आपण थक्क होऊन जातो, त्याचबरोबर त्यातील कलाकारांचे मानधन तसेच चित्रपटांच्या दिगदर्शकांचे मानधन देखील चित्रपटाच्या भरघोस कमाईमुळे वाढलेले आहे. बहुचर्चित चित्रपट बाहुबली आणि त्याचे दिग्दर्शक एस एस राजा मौली यांचे नाव घ्यायला विसरायला नको. बहुचर्चित चित्रपट बाहुबली आणि त्याचे दिग्दर्शक एस एस राजमौली यांचे नाव घ्यायला विसरायला नको, हजारो कोटींचा नफा मिळविणाऱ्या या एका चित्रपटावरून थोडा अंदाज येऊ शकतो कि दिग्दर्शन करणारे हे दिग्ग्ज नक्कीच भली मोठी रक्कम घेत असणार.

rajkumar hirani director
rajkumar hirani director
बॉलिवूड मधील उत्कृष्ट दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी दिगदर्शीत केलेले सर्व चित्रपटाना नेहमीच एक वेगळेपण असते, त्यामुळेच त्यांचे चित्रपट खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय झाले आहेत. राजकुमार हिराणी यांच्या वेगळ्या शैलीमुळे त्यांना भरपूर लोकप्रियता मिळाली आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने मिशन कश्मीर (Mission Kashmir), मुन्ना भाई एम बी बी एस (Munna Bhai M.B.B.S.), लगे रहो मुन्ना भाई (Lage Raho Munna Bhai), थ्री इडियट्स (3 Idiots), फेरारी कि सवारी (Ferrari Ki Sawaari), पीके (PK), साला खडूस ( Saala Khadoos), आणि अलीकडेच प्रदर्शित झालेला संजू (Sanju) असे बहुचर्चित सिनेमे आहेत. पण जेवढे सुंदर त्यांचे दिग्दर्शन असते तेवढीच त्यांच्या मानधनाची रक्कम असते. हिंदी चित्रपट सृष्टीत कमालीचे प्रसिद्ध असलेल्या राजकुमार हिराणी यांची जर आपण रक्कम ऐकली तर आश्चर्य वाटेल, ते एका चित्रपटासाठी तब्ब्ल १८ ते २५ करोड रुपये घेतात.

rohit shetty director
rohit shetty director
रोहित शेट्टी हे बॉलिवूड मध्ये सर्वात जास्त लोकप्रिय आहेत, ऍक्शन कॉमेडी डायरेक्टर म्हणून त्यांचे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात. बॉलिवूड प्रमाणेच हॉलिवूड मध्येही त्यांनी आपल्या नावाचा डंका गाजविला आहे. रोहितचे सुपर डुपर हिट झालेल्या चित्रपटांच्या यादीत जमीन (Zameen), गोलमाल (Golmaal), ऑल द बेस्ट (All The Best), सिंघम (Singham), चेन्नई एक्स्प्रेस (Chennai Express), दिलवाले (Dilwale), सिम्बा (Simmba) अशा चित्रपटांची रेलचेल आहे. साहजिकच रोहित शेट्टी हा देखील सर्वाधिक मानधन घेणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. त्याची रक्कम ऐकून थक्क व्हायला होते, एका चित्रपटासाठी रोहित जवळपास ३८ ते ४० करोड रुपये घेतो. जबरदस्त एक्शन पुढे हि रक्कम तशी कमीच वाटते नाही..

karan johar director
karan johar director
करण जोहर हा देखील बॉलिवूड मधील लोकप्रिय जॉली दिग्दर्शक आहे , त्याचे चित्रपट मनोरंजन आणि प्रेमकथांवर जास्त फोकस करीत असल्याने लोकांचे खूप जास्त मनोरंजन करतात. करण जोहर हे नाव त्याच्या चित्रपटांप्रमाणेच प्रसिध्द झाले आहे, कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai), कभी ख़ुशी कभी गम (Kabhi Khushi Kabhie Gham), कल हो ना हो (Kal Ho Naa Ho), दोस्ताना (Dostana), वेक अप सिद (Wake Up Sid), माय नेम इज खान (My Name Is Khan), स्टुडंट ऑफ द इयर (Student of the Year), डिअर जिंदगी (Dear Zindagi), बद्रीनाथ कि दुल्हनिया (Badrinath Ki Dulhania), राझी (Raazi), यामुळेच फिल्म इंडस्ट्री मध्ये त्याच्या नावाची लोकप्रियता प्रचंड आहे. त्याने भरपूर चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून सुरुवातीच्या काळात भरपूर चित्रपटांमध्ये कामही केले आहे. त्याने दिगदर्शीत केलेले सर्व चित्रपट उत्कृष्ट आहेत, पण असे सुंदर दिग्दर्शन करण्यासाठी करण जोहर सुद्धा खूप मोठी रक्कम घेतो, तो एका चित्रपटासाठी जवळपास २४ ते ३५ करोड रुपये घेतो.

mani ratnam director
mani ratnam director
मनिरत्नम हे त्यांच्या तमिळ सिनेमा इतकेच बॉलिवूड मध्येही लोकप्रिय दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात, त्यांचे अनेक चित्रपट प्रदर्शित झाले असून त्यांच्या चित्रपटांनी तरुण वर्गाला प्रेमाचे धडे गिरवायला शिकवले असे म्हणायला वावगे ठरणार नाही.. त्यांच्या प्रमुख लोकप्रिय हिंदी चित्रपटांमध्ये दिल से (Dil Se..) , साथिया (Saathiya), युवा (Yuva), गुरु (Guru), रावण (Raavan), ओके जानू (Ok Jaanu) चित्रपट असून प्रसिद्ध तमिळ चित्रपटांची यादी शंभरी नक्कीच गाठेल. त्यामुळे मनिरत्नम ही बॉलिवूड मधील लोकप्रिय हस्ती, त्यांनी दिगदर्शीत केलेले सर्व चित्रपट उत्कृष्ट आहेत अर्थातच मानधन देखील जास्तअसणार. जसा त्यांचा चाहता वर्ग मोठा तशीच त्यांची रक्कम देखील खूप मोठीहे समीकरण येथे लागू पडते.. मनिरत्नम हे जवळपास एका चित्रपटासाठी १२ करोड रुपये घेतात.

हे काही बॉलिवूड मधील दिग्दर्शक होते ज्यांनी कलेचा वारसा जपत उत्तम दिग्दर्शन केले असून भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. यांचे देश, विदेशातील लोक चाहते आहेत तेथेही त्यांचे चित्रपट प्रदर्शित होत असल्याने कलाकारांप्रमाणेच त्यांचाही विदेशातील चाहहत वर्ग खूप मोठा आहे.. तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा, मराठी चित्रपट सृष्टी देखील आता विशाल रूप धारण करीत आहे, तुम्हाला मराठी दिग्दर्शकांचे मानधन जाणून घ्याचे असल्यास आम्हला कमेंट द्वारे कळवायला विसरू नका.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.