Breaking News
Home / मालिका / सुप्रसिद्ध हिंदी मालिकांमधील हा चेहरा आता झळकतोय मराठी मालिकेत…
actress swati pansare
actress swati pansare

सुप्रसिद्ध हिंदी मालिकांमधील हा चेहरा आता झळकतोय मराठी मालिकेत…

कसौटी जिंदगी की, क्राईम पेट्रोल, क्राईम अलर्ट, ये जादू है जिन्न का, इशकबाझ, मेरी आवाज ही पहचान है, बालवीर, नमः, एक हसीना थी या सुप्रसिद्ध हिंदी मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री “स्वाती पानसरे” झी मराठी वाहिनीवरील “माझी तुझी रेशीमगाठ” या सुप्रसिद्ध मराठी मालिकेतून आपल्या भेटीस आली आहे.

actress swati pansare
actress swati pansare

या मालिकेत ती ‘मिथिला’ ची भूमिका साकारताना दिसत आहे. मिथिलाच्या भूमिकेला वेगवेगळ्या छटा आहेत… ती काहीशी भोळी, काहीशी विनोदी तसेच थोडीशी इमोशनल देखील आहे. स्वाती पानसरे यांनी या आधी तनिष्क, डॉय सोप, डिलाईट नट्स, केसरी टूर्स, HDFC होम लोन या आणि अशा अनेक जाहिराती साकारल्या आहेत तसेच तब्बल १२ मराठी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केले आहे. ‘आप्पा आणि बाप्पा’ या सुप्रसिद्ध चित्रपटात त्यांनी भरत जाधव आणि सुबोध भावे यांच्यासोबत, तसेच ‘माझ्या बायकोचा प्रियकर’ या चित्रपटात अनिकेत विश्वासराव आणि भारत गणेशपुरे यांच्यासोबत काम केले आहे. ‘काळीच्या लग्नाला यायचं हं!’ या चित्रपटात अभिनेत्री स्मिता तांबे हिच्यासोबत झळकण्याची संधी मिळाली. स्वाती पानसरे या बहुतेक चित्रपट आणि मालिकेतून नाईकेच्या आईच्या भूमिकेत पाहायला मिळाल्या. कसौटी जिंदगी की या मालिकेतून त्यांनी ‘चंद्रिका’ ही विरोधी भूमिका साकारलेली पाहायला मिळाली.

swati pansare mithila
swati pansare mithila

झी मराठी वाहिनीवरील माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांनी ती अक्षरशः डोक्यावर घेतलेली दिसून येते. मालिकेतील सर्वच कॅरॅक्टर्स प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. एवढेच नव्हे तर या मालिकेवरील मीम्स सुद्धा प्रचंड गाजत आहेत. या मालिकेमधील कलाकारांचे रिल्स सुद्धा सध्या इन्स्टाग्राम वर पाहायला मिळत आहेत.. सर्व कलाकारांची व स्क्रीन तसेच ऑफ स्क्रीन केमिस्ट्री खूप छान रंगली आहे. चौधरी कुटुंबातली मिथिला काकी मालिकेतून पुढे काय काय धमाल घडवते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यश आणि नेहाचे लग्न व्हावे म्हणून ती प्रयत्न करणार की त्यांच्या नात्यात आडकाठी आणणार हे येत्या काही दिवसातच मालिकेतून स्पष्ट होईल, तुर्तास या भूमिकेसाठी अभिनेत्री स्वाती पानसरे यांना kalakar.info तर्फे खूप खूप शुभेच्छा…

swati pansare
swati pansare

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.