Breaking News
Home / मराठी तडका / मराठी सृष्टीतील हि प्रसिद्ध जोडी लवकरच बनणार आई बाबा.. फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी
sangram salvi khushbhu tavade salvi
sangram salvi khushbhu tavade salvi

मराठी सृष्टीतील हि प्रसिद्ध जोडी लवकरच बनणार आई बाबा.. फोटो शेअर करून दिली आनंदाची बातमी

मराठी सृष्टीतील सेलिब्रिटी कपल म्हणून ओळखलं जाणार जोडपं लवकरच आई बाबा होणार असल्याचे समोर आले आहे. हे प्रसिद्ध कपल आहे अभिनेता “संग्राम साळवी आणि खुशबू तावडे- साळवी”. लवकरच खुशबू आणि संग्राम साळवी हे आई बाबा होणार असल्याची बातमी त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कळवली आहे. त्यांच्या या गोड बातमीने मराठी सृष्टीतील कलाकारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलेला पाहायला मिळतो आहे.

sangram and khushbhoo
sangram and khushbhoo

देवयानी या मालिकेतील तुमच्यासाठी काय पण हा डायलॉग तुम्हाला नक्कीच आठवत असेल. या मालिकेमुळे संग्राम साळवी हा नवा आणि तगडा अभिनेता मराठी सृष्टीला मिळाला होता. या मालिकेशिवाय संग्राम साळवी आई माझी काळूबाई या मालिकेतून दिसला. यात तो विरोधी भूमिकेत पाहायला मिळाला होता. सरस्वती, कुलस्वामिनी, मी तुझीच रे या मालिकेतून त्याने अभिनय साकारलेला पाहायला मिळाला. संग्रामची पत्नी खुशबू तावडे ही देखील हिंदी मालिका तसेच मराठी मालिका अभिनेत्री आहे. पारिजात, धर्मकन्या, प्यार की एक कहाणी, तेरे बिन आम्ही दोघी या मालिकेत तिने काम केले आहे. ‘तारक मेहता का उलटा चश्मा’ या लोकप्रिय मालिकेतून खुशबूने बुलबुलची भूमिका साकारली होती. देवयानी या मालिकेत संग्राम आणि खुशबू एकत्रित झळकले होते. यात ती तारा च्या भूमिकेत दिसली होती. इथूनच त्या दोघांमध्ये मैत्री वाढत गेली आणि ५ मार्च २०१८ रोजी त्यांनी लग्नाची गाठ बांधली. अभिनया व्यतिरिक्त संग्राम मुंबईत स्वतःचे एक कॅफे हाऊस देखील चालवत आहे. ‘साईड वॉक कॅफे’ या नावाने त्याने हे कॅफे सुरू केले असून अनेक सेलिब्रिटींनी त्याच्या कॅफेमध्ये हजेरी लावलेली पाहायला मिळते.

khushbu and sangram salvi
khushbu and sangram salvi

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.