Breaking News
Home / ठळक बातम्या / सिनेमात काम करतो असे सांगून थ्री स्टार हॉटेलला २५ लाखांचा गंडा
three star hotel kharghar
three star hotel kharghar

सिनेमात काम करतो असे सांगून थ्री स्टार हॉटेलला २५ लाखांचा गंडा

सिनेमात काम करतो असे सांगून नवी मुंबईतील खारघर येथील थ्री स्टार हॉटेलमध्ये एक इसम गेल्या गेल्या वर्षभरापासून राहत होता. हॉटेलने बिल देताच या इसमाने आपल्या लहान मुलासह खिडकीतून पळ काढला. ही घटना नुकतीच समोर आली असून हॉटेल मालक शेट्टी यांनी त्याच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, मागच्या नोव्हेंबर महिन्यापासून मुरली कामत नावाचा एक व्यक्ती सिनेमात काम करत असल्याचे सांगून आपल्या लहान मुलासह सुपर डीलक्स रूम बुक करून राहत होता. सिनेमात काम करत असल्याचे सांगून त्याच्या भेटीला अनेक लोक हॉटेलमध्येच येत असत. त्यासाठी कामतने आणखी एक वेगळी डीलक्स रूम त्यांच्या भेटीसाठी बुक केली होती. इतके दिवस राहूनही कामत हॉटेलचे बिल थकवत राहिला. मी चित्रपटात अनिमेशन आणि व्हिएफएक्सचे काम करतो, माझ्या कामाचे पैसे अडकले असल्याचे सांगून त्याने हॉटेलचे बिल देण्यास टाळाटाळ केली. यादरम्यान हॉटेलमध्ये त्याला भेटायला आलेल्या व्यक्ती कामत कडे पैशांची मागणी करू लागली. त्यामुळे त्या व्यक्तीने अजूनही लोकांना फसवले असल्याचे हॉटेल मालक संतोष शेट्टी यांच्या लक्षात आले. फेब्रुवारी महिन्यात कामत यांच्या कडून तीन नाव नसलेले चेक घेण्यात आले मात्र ते बँकेत भरले नाही माझ्याकडे पैसे आले की भरा असे म्हणून तारीख पुढे पुढे ढकलण्यात येऊ लागली.

three star hotel kharghar
three star hotel kharghar

या दोन्ही रूमचे बिल तब्बल २५ लाख झाले असल्याने ते कामत यांच्याकडून कसे चुकते करायचे हा प्रश्न संतोष शेट्टी यांना पडला होता. हे बिल पाहताच कामत यांनी आपल्या मुलासह त्यांच्या रूमच्या बाथरूममधील खिडकीतून पळ काढला. रूममध्ये त्यांनी त्यांचा लॅपटॉप तसाच ठेवला होता. त्याअगोदर कामत यांनी काही औषधं मागवली होती. ती औषधं देण्यासाठी हॉटेलमधील एक कर्मचारी त्यांच्या रूमचे दार वाजवत होता. बराच वेळ झाला तरीही आतून कोणीच दार उघडले नसल्याचे पाहून त्यांनी डुप्लिकेट चावीने दार उघडले. त्यावेळी रूममध्ये कामत आणि त्यांचा मुलगा नसल्याचे उघडकीस आले. ही घटना पोलीस ठाण्यात जाऊन सांगितली असता ह्या कामतने याअगोदर अशाच काही हॉटेलला गंडा घातला होता. दरम्यान मुरली कामत हा मुरोळ अंधेरी येथे राहत असल्याचे सांगितले जाते.

hotel interior
hotel interior

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.