Breaking News
Home / मराठी तडका / एका रात्रीत स्टार झालेल्या “सिलेंडर मॅन” ला मिळणार चित्रपटात संधी, या दिग्दर्शकाने दिले आश्वासन…..
sagar pandit jadhav cylinder man

एका रात्रीत स्टार झालेल्या “सिलेंडर मॅन” ला मिळणार चित्रपटात संधी, या दिग्दर्शकाने दिले आश्वासन…..

नमस्कार रसिकहो,

सोशल मीडियावर आजकाल अनेक जण लोकप्रिय होत आहेत, या माध्यमातून भरपूर लोक जगासमोर व्यक्त होतात. कधी कधी सोशल मीडियामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला सहज मदत होते तर कधी कोणावर अन्याय झाला असेल तर त्याला न्याय देखील मिळवून दिला जातो. त्यामुळे सोशल मीडिया आजकाल खूप महत्वाचे बनले आहे. इथे प्रत्येक युजर आपले मत मांडत असतो, आपली परिस्थिती सांगत असतो. काही वेळा लोक आपली आवड, संस्कृती सुद्धा यावरप्रकर्षाने दाखवतात, त्यामुळे आपणाला प्रत्येक वेळी काही तरी नवीन पाहायला, शिकायला  मिळते.

हल्ली सोशल मीडियावर एक सिलेंडर मॅन खूप चर्चेत आला आहे, तो रातोरात स्टार बनला असून अनेकजण त्याचे चाहते बनले आहेत. तो दिसायलाही खूप आकर्षक आहे त्यामुळे त्याच्या फोटोला भरपूर लाईक्स भेटत आहेत. त्याच्याकडे पाहून अनेकांना असे वाटत होते की त्याने चित्रपटात काम करावे, त्याने देखील पडद्यावर झळकावे आणि आता काहीसे असेच होणार असून मराठी चित्रपट सृष्टीतील  दिग्दर्शक यांनी त्यांच्या आगामी चित्रपटात संधी देण्याचे आश्वासन दिले आहे, त्यामुळे सर्व युजर खूप खुश झाले आहेत.

sagar jadhav cylinder man
sagar jadhav cylinder man

कोण आहे बरं हा हँडसमसिलेंडर मॅन? सोशल मीडियावर अंबरनाथ येथील भारत गॅस घरगुती गॅस सिलेंडर वाहतूक करणाऱ्या सागर जाधवचा फोटो त्याचा मित्र तुषारने पोस्ट केला होता, तुषारने सागर बद्दल भरपूर गोष्टींचा उलगडा केला आहे. त्याने सागर बद्दल सोशल मीडियावर खूप काही सांगितले आहे. अचानक एवढी लोकप्रियता मिळाल्यामुळे सागर भारावून गेला होता, त्याला हे सगळं चकित करून सोडणारे आहे. त्यात त्याला प्रवीण तरडे यांनी चित्रपटात काम देण्याचे आश्वासन दिले आहे त्यामुळे त्याचा आनंद दुप्पट झाला आहे.  तसा तो दिसायलाही खूप छान आहे त्यामुळे त्याला चित्रपटात काम मिळणे साहजिक आहे आणि तसेच मराठी सह हिंदी चित्रपट सृष्टीत देखील तो झळकला तर यामध्ये काही नवल वाटायला नको.

pravin vitthal tarde sagar jadhav
pravin vitthal tarde sagar jadhav

सागरला अचानक इतकी प्रसिद्धी मिळाली आहे त्यामुळे तो थोडा गोंधळून गेला आहे, त्याला खूप विस्मयचकित वाटत आहे. पण त्याला ही अचानक मिळालेली संधी त्याच्यासाठी खूप मौल्यवान आहे. सोशल मीडियामुळे त्याला ही संधी मिळाली असून आपले नशीब ऊजळवण्याची त्याला ही सुवर्णसंधी मिळाली आहे. नवीन शैलीतील चित्रपट निर्माते प्रवीण तरडे यांचे हे कार्य खूप कौतुकास्पद आहे, त्यांनी या नवीन कलाकाराला सहज संधी दिली, त्याला प्रवाहासोबत वाहण्यासाठी एक मदतीचा हात दिला त्यामुळे त्यांच्याप्रती रसिकांच्या मनातील आदर आणखीन वाढला आहे.

प्रवीण विठ्ठल तरडे हे सर्वांच्या परिचित लोकप्रिय दिग्दर्शक असून त्यांनी अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून ते एक उत्तम लेखक देखील आहेत. ते नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि चर्चेत देखील असतात. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांची फॅन फॉलोविंग भरपूर आहे. त्यांनी सागरला  पडद्यावर येण्याची एक संधी दिली त्याबद्दल त्यांचे खूप कौतुक केलं जात आहे. तसेच सागरला देखील आयुष्य घडवण्याची एक सुरेख संधी लाभली आहे आता त्याने या संधीचे सोने करावे इतकीच अपेक्षा. सागरला त्याच्या पुढील आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा. मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

sagar pandit jadhav
sagar pandit jadhav
सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोक घरबसल्या पैसे देखील कमावतात, काहीजण आपली कला सादर करतात तर काहीजण आपली समस्या मांडतात. इथे लाखो करोडो लोक नेहमी उपस्थित असतात त्यामुळे अगदी क्षणात एखादी बातमी पसरते. त्या बातमीची अनेक दिवस चर्चा सुरू असते, खूपच चित्तथरारक काही घटना असेल तर चर्चेला देखील चांगलेच उधाण येते.  या सोशल मीडिया बद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे, यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेली माणसे एकमेकांच्या संपर्कात येऊन खूप जवळची बनून जातात, माहितीची देवाणघेवाण होत असते तसेच मदतीची देखील देवाणघेवाण होत असते.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.