Breaking News
Home / बॉलिवूड / ​​१५ वर्षाच्या नात्याला झाली इजा, अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट…
aamir khan kiran rao divorce
aamir khan kiran rao divorce

​​१५ वर्षाच्या नात्याला झाली इजा, अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट…

नमस्कार,

मित्रहो बॉलिवूडमध्ये नेहमीच काहीतरी खळबळ जनक बातमी व्हायरल होत असते, काहींनी लग्नाचा थाट मांडले​​ला असतो तर काहींनी घटस्फोटाचे कागद छापलेले असतात. त्यातच ब्रेकअप, पॅच अप पण असतेच त्यामुळे हे लोकांसाठी काही नवीन नाही. मात्र खूपदा असे होते की नुकताच लग्न झालेले जोडपे ए​​कमेकांना समजून न घेतल्याने घटस्फोट घेऊन दूर होतात. त्यामुळे यामध्ये नवल वाटत नाही, पण ​​सध्या बॉलिवूड मध्ये एक बातमी अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या बातमीमुळे भरपूर लोक चकित झाले आहेत. कोणालाच याची कसली पूर्वकल्पना न्हवती किंवा अशी कोणाला अपेक्षा देखील न्हवती त्यामुळे ही बातमी कळताच सर्वजण थक्क झाले आहेत.

बॉलिवूड मधील आपल्या अभिनयाच्या शैलीने विशेष लोकप्रिय असणारे अभिनेते आमिर खान यांनी भरपूर चित्रपट केले आहेत. लाखो करोडो लोक त्यांच्या अभिनयाचे दिवाने आहेत. त्यांनी अनेक भूमिका खूप रेखीव बनवल्या असून त्यातील त्यांचा अभिनय अप्रतिम आहे. आमिर ​हा ​अथक परिश्रमाने यशाच्या शिखरावर पोहोच​ला असून त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले आहेत. त्यांचा इश्क, राजा हिंदुस्थानी, मन, अकेले हम अकेले तुम, लगान, दंगल, गजनी, गुलाम या व अशा अनेक चित्रपटात त्यांनी अतुलनीय अभिनय साकारला आहे. चित्रपट सृष्टीतील आमिर हे एक शांत स्वभावाचे कलाकार मानले जातात, ते नेहमीच सर्वांचे आवडते राहिले आहेत. मात्र आमिर आता बॉलिवूड मध्ये एका वेगळ्याच कारणाने विशेष चर्चेत आले आहेत. त्यांनी व त्यांची पत्नी किरण राव हीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयात दोघांची सहमती असून ते दोघेही अगदी शांतपणे, सहमतीने घटस्फोट घेत आहेत.

aamir khan new movie look
aamir khan new movie look

त्यांच्या या घटस्फोटामागे काय कारण आहे ते अद्याप स्पष्ट झाले नाही, त्यामुळे त्यांच्या चाहत्यांच्या मनात गोंधळ निर्माण झाला असून सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरू आहे. या दोघांची केमिस्ट्री बॉलिवूड मधील प्रत्येक चाहत्याला आवडते, त्यांची बॉंडिंग खूप सुरेख आहे. किरण राव आणि आमिर खान या दोघांचेही हे दुसरे लग्न होते मात्र आता ते घटस्फोट घेत आहेत, यानंतर त्यांच्या मुलाची काळजी हे दोघेही घेत राहतील. आमिर म्हणतात की आयुष्याची एक नवी सुरुवात करत आहोत, दोघेजण पतिपत्नी नाही राहिलो तरीही मित्र मैत्रीण नेहमी राहील. नाते नसले तरीही मैत्री नेहमीच जपली जाईल. अमिर खान एका मुलाखतीत सांगत होते की जेव्हा त्यांच्या लगान चित्रपटाची शूटिंग चालू होती तेव्हा पहिल्यांदा किरण आणि आमिर यांची भेट झाली होती, ती असिस्टंट डायरेक्टर पैकी एक होती. तेव्हा फक्त एक तोंड ओळख होती, आमच्यात कसलेच नाते न्हवते, साधी मैत्री पण न्हवती.

aamir
aamir

आमिरचा घटस्फोट झाला तेव्हा त्यांची पुन्हा किरण सोबत भेट झाली होती, ट्रोमच्या फेजमध्ये तीचा फोन आला होता आणि जवळपास आमिर किरण सोबत अर्धा तास बोलले होते . तेव्हा ते स्वतःच थक्क झाले होते, त्यांना किरण सोबत बोलताना खूप आनंद व्हायचा. पुढे त्यांनी डेटिंग सुरू केली, आमिर सांगतात की लग्नाआधी ते जवळपास दीड वर्ष सोबत होते. २००५ मध्ये आमिर आणि किरण लग्नबेडीत अडकले. किरणच्या प्रोफेशनल लाईफ बद्दल सांगायचं झालं तर ती एक सिने निर्माती, स्क्रीन रायटर तसेच दिग्दर्शक देखील आहे. तीने जाने तू या जाने ना , धोबी घाट , दंगल, तलाश, सिक्रेट सुपरस्टार , पिपली लाईव्ह या सारख्या चित्रपटांची निर्मिती केली आहे. आमिर आणि किरण हे दोघेही खूप लोकप्रिय आहेत, त्यांना एक मुलगा सुद्धा आहे त्याचे नाव आझाद आहे.

किरण आणि अमिर दोघेही देशभरात पाणी फौंडेशनसाठी काम करतात. या दोघांची जोडी अनेकांना फार आवडते, पण आता हे दोघे घटस्फोट घेत असल्याने त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. जरी ते दोघे पती पत्नी नाही राहिले तरीही त्यांची मैत्री सदैव राहावी ही सदिच्छा. मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.