Breaking News
Home / बॉलिवूड / जे भल्याभल्यांना जमले नाही ते विद्युत जम्मवालने करून दाखवले.. जॅकी चेन, टोनी जा आणि ब्रुसली च्या यादीत स्थान…
vidyut jammwal hollywood tony jaa
vidyut jammwal hollywood tony jaa

जे भल्याभल्यांना जमले नाही ते विद्युत जम्मवालने करून दाखवले.. जॅकी चेन, टोनी जा आणि ब्रुसली च्या यादीत स्थान…

कमांडो वेबसिरीजच्या निमित्ताने तुफान चर्चेत असलेला मार्शल आर्ट स्पेशालिस्ट आणि उत्तम अभिनेता विद्युत जम्मवाल याने अल्पावधीतच त्याच्या करिअरमधला मैलाचा दगड गाठला आहे. जे अनेक प्रस्थापित दिग्गजाना जमले नाही ते विद्युत जम्मवालने अगदी करिअरच्या ऐन सुरूवातीच्या काळातच करून दाखवले आहे. विद्युत जम्मवाल याने थेट हॉलीवूडमधे झेप घेतली आहे. आता तो फक्त भारतातच नाही तर पूर्ण जगात ओळखला जाणार आहे.

अमेरिकेच्या सुप्रसिद्ध वंडर स्ट्रीट कंपनीने विद्युत जम्मवालला साईन केले आहे. वंडर स्ट्रीट ही एक चित्रपट निर्माती कंपनी असून या कंपनीने टोनी जा, मायकेल जा आणि डॉल्फ लंडग्रेन यांसारख्या ख्यातनाम कलाकारांचे चित्रपट केले आहेत. वंडर स्ट्रीट कंपनीच्या भागीदारांनी सांगितले आहे की लवकरच विद्युत जम्मवाल हा संपूर्ण जगात ओळखला जाणार आहे. यावर विद्युत जम्मवाल म्हणाला आहे की, “मी सुद्धा हॉलीवूडच्या मेहनती लोकांसोबत काम करण्यासाठी अत्यंत उत्सुक आहे”. इतकेच नव्हे तर करीअरमधील या ब्रेकमुळे विद्युतचे नाव चक्क जॅकी चेन आणि ब्रुस ली यांच्यासारख्या दिग्गजांच्या यादीत सामाविष्ट झाले आहे. जेंव्हादेखील तुम्ही गूगलवर मार्शल आर्टीस्ट लोकांना सर्च कराल तेंव्हा तुम्हाला विद्युत जम्मवाल याचे नाव जॅकी चेन आणि ब्रुस ली यांच्या लगोलग पाहायला मिळणार आहे.
वंडर स्ट्रीट एंटरटेनमेंटच्या पुढच्या प्रोजेक्टमधे आता विद्युत जम्मवाल आपल्याला स्टंट करताना दिसून येणार आहे.

vidyut jammwal action hero of bollywood
vidyut jammwal action hero of bollywood

ही बॉलीवूडसाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. याआधी जंगली आणि खुदा हाफीझ या चित्रपटात विद्युतने काम केले होते. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार असेही सांगण्यात येत आहे की खुदा हाफीझ या सिनेमाचा सिक्वल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. याचबरोबर विद्युतचा सनक हा सिनेमाही लवकरच रिलिज होणार आहे. इतकेच नाही तर विद्युत जम्मवाल हा निर्मिती क्षेत्रातही उतरला आहे. त्याने “अॅक्शन हिरोज फिल्म्स” नावाची चित्रपट निर्मिती संस्था स्थापन केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून तो अनेक आंतरराष्ट्रीय कलाकारांसोबत काम करणार आहे. त्यांना संधी देणार आहे. अशाप्रकारे विद्युत जम्मवाल ह्याने अभिनयाबरोबरच निर्माता म्हणूनही जम बसवला आहे. वंडर स्ट्रीटच्या निमित्ताने विद्युत हा अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या लोकांच्या संपर्कात येऊ शकतो आणि त्यांच्यासोबत प्रोजेक्ट्स करू शकतो. कुठल्याही अभिनेत्याला गरज असते ती एका ठिणगीची.. ही ठिणगी विद्युतला गवसली आहे.

vidyut jammwal and scott adkins
vidyut jammwal and scott adkins

विद्युतने केलेले काम अभिमानास्पद आहे, विद्युत जम्मवाल याला कलाकार.इन्फो च्या संपूर्ण टीम तर्फे पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.