Breaking News
Home / बॉलिवूड / बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी लवकरच वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला..
finding anamika madhuri
finding anamika madhuri

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी लवकरच वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला..

बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित लवकरच एका वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. करण जोहरच्या कलंक या चित्रपटात माधुरी झळकली होती. बऱ्याच कालावधीनंतर ती पुन्हा एकदा आभिनयाकडे वळलेली पाहायला मिळत आहे. कलर्स वाहिनीवरील डान्स दिवाने या रिऍलिटी शो मध्ये माधुरी दीक्षित परीक्षकाच्या भूमिकेत दिसली. या रिऍलिटी शोमध्ये माधुरीच्या नृत्याची झलक प्रेक्षकांना अनेकदा पाहायला मिळाली होती. नुकताच माधुरीने आपल्या आगामी वेबसीरीजचा ट्रेलर इंस्टाग्रामच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

finding anamika madhuri
finding anamika madhuri

क्या आप तैयार हो अनामिका से मिलने?.. Finding Anamika असे कॅप्शन देऊन तिने तिच्या ‘फाईंडिंग अनामिका’ या आगामी वेबसीरिजची बातमी चाहत्यांना कळवली आहे. या वेबसिरीजच्या माध्यमातून पहिल्यांदाच माधुरी दीक्षित ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. फाईंडिंग अनामिकाच्या माध्यमातून माधुरी दिक्षितची अभिनयाची जादू प्रेक्षकांना पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. या वेबसिरीजची निर्मिती करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा यांनी मिळून केली आहे. तर त्याचे कथानक श्री राव आणि निशा मेहता यांनी लिहिले आहे. माधुरी दीक्षितसोबत आणखी बरेच प्रसिद्ध चेहरे या वेबसिरीजमध्ये झळकणार आहेत. कित्येक वर्षांनी माधुरी दीक्षित ही संजय कपूर सोबत पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. या दोघांसोबत मानव कौल, लक्षविर सरण, सुहासिनी मुळ्ये, मुस्कान जाफरी महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

madhuri dixit
madhuri dixit

फाईंडिंग अनामिका मधील माधुरीचा पहिला लूक समोर आला आहे. यात माधुरी एका ग्लॅमरस भूमिकेत दिसत आहे. फाईंडिंग अनामिका ही फॅमिली सस्पेन्स ड्रामा सिरीज आहे. एक सुपरस्टार, पत्नी आणि आई अशा तिन्ही भूमिकेत वावरणारी अनामिका अचानक कुठेतरी निघून जाते. तिचा शोध घेत असताना तिच्या आयुष्यात घडलेल्या काही घटना तुम्हाला आश्चर्यचकित करणाऱ्या असतील. लवकरच ही वेबसिरीज नेटफ्लिक्सवर दाखवण्यात येणार आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.