Breaking News
Home / जरा हटके / लपंडाव चित्रपटाची नायिका आता दिसते आणखी स्मार्ट, अमेरिकेत राहून..

लपंडाव चित्रपटाची नायिका आता दिसते आणखी स्मार्ट, अमेरिकेत राहून..

​​१९९३ साली “लपंडाव” हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपटात अशोक सराफ, विक्रम गोखले, सविता प्रभुणे, वर्षा उसगांवकर, अजिंक्य देव, सुनील बर्वे या दिग्गज स्टार कास्ट सोबत आणखी एक अभिनेत्री झळकली होती. या अभिनेत्रीचे नाव आहे पल्लवी रानडे खारकर. ​​पल्लवीचा लपंडाव ​​हा पहिलाच चित्रपट, यात तिने ‘मुग्धाची’ अप्रतिम भूमिका साकारली होती. तर सुनील बर्वे याने या चित्रपटात असिमची भूमिका बजावली होती. त्यानंतर ती या झगमगत्या दुनियेपासून दूर गेली ती परत कधी दिसलीच नाही.

pallavi ranade kharkar
pallavi ranade kharkar

असिमचे वर्षा उसगावकर म्हणजेच रसिकावर प्रेम होते. मात्र रसिकाचे विक्रम म्हणजेच अजिंक्य देववर प्रेम होते. मुग्धा “तीन फुल्या आणि तीन बदाम” निनावी असीमला आणि रसिकाला प्रे​​मपत्र पाठवते. त्या दोघातला मधला दुवा बनण्याची जबाबदारी मुग्धाने चोख बजावली होती. हा सगळा गोंधळ पुढे त्यांच्याच आई वडिलांवर कसा उलटतो याचे सुरेख कथानक दिग्दर्शका श्रबानी देवधर यांनी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर मांडले होते. या चित्रपटाला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार आणि राज्य चित्रपट महोत्सवात विशेष अभिनेत्री म्हणून पल्लवी रानडे आणि सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून सई देवधर हिला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते. सई देवधर हिने असिमच्या बहिणीची म्हणजेच चिनुची भूमिका बजावली होती. या एकाच चित्रपटामुळे पल्लवीला भरपूर प्रसिद्धी मिळाली खरी पण पुढे मात्र ती कोणत्या चित्रपटात पाहायला मिळाली नाही. परंतु असे असले तरी ती एका वेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करताना दिसत आहे.

pallavi ranade kharkar family
pallavi ranade kharkar family

ती सध्या काय करते ते वाचून तुम्हाला नक्कीच सुखद धक्का बसेल. पल्लवी सध्या अमेरिकेतील सॉल्ट लेकसिटी युटा येथे स्थायिक आहे. पल्लवीने कम्प्युटर सायन्स मधून पदवीधर असून आज जवळपास ​२० वर्षाहून अधिक​ ​काळापासून ती बायोमेडिकल इन्फॉर्मेटिक क्षेत्रात कार्यरत आहे. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट लिडरशिप या क्षेत्राचाही तिला दांडगा अनुभव आहे. पल्लवी ही संदीप खारकर सोबत विवाहबद्ध झाली असून त्यांना दोन मुली आहेत. पल्लवी​​ची लेक विस्मया खारकर हिला नृत्याची विशेष आवड आहे, परदेशात राहून ति​​ने शास्त्रीय नृत्याचे धडे गिरवले आहेत. नुकतेच हार्वर्ड यूनिवर्सिटी मधून तिने पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. पल्लवी रानडे ही अभिनेत्री झगमगत्या दुनियेपासून बाजूला होऊन अनेक वर्षे लोटली असली तरी तिने साकारलेली लपंडाव चित्रपटातली निरागस मुग्धा रसिकजनांच्या कायम स्मरणात असेल यात शंका नाही.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.