उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे यांनी बिगबॉस मालिकेविषयी समर्पक प्रतिक्रिया देत त्याच्या चाहत्या प्रेक्षकांची नाराजी आपल्या चावडीत मांडली आहे. सुरवातीला उत्कर्षचे विचार विशाल या स्पर्धका सोबत पटत नव्हते, तरीही त्याने विशालचा वापर कॅप्टन निवडण्यासाठी केला, तर याचा राग चावडीला आला आणि उत्कर्ष डबल गेम खेळतोय म्हणजेच डबल ढोलकी आहे असा अर्थ काढण्यात आला. हा खेळ सुरुवातीला एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाण्याचाच खेळ आहे कारण काही टास्क तसेच आहेत जे ग्रुपने खेळावे लागतात.
विशालने कॅप्टन्सी टास्कमध्ये उत्कर्ष यांना मदत केली म्हणून उत्कर्षनीही परतफेड म्हणून विशालला बाद प्रक्रियेत त्याच्या नावाची पाटी न तोडता वाचवले आणि ते विशालच्या नंतर लक्षातही आलं. पण चावडीला ही खिलाडू वृत्ती दिसली नाही? आणि काही प्रेक्षाकांना ही कळावं म्हणून सांगतोय की बिग बॉसच्या घरात मला चावडी पण डबल ढोलकी दिसते. कारण आता खेळ रंगत आला आहे. चावडीनेच दोन टीम पाडून दिल्या, तुम्ही टीमसाठी खेळा आणि स्वतःसाठी देखील, हे सांगणारी पण चावडीच. म्हणजेच खेळणारे स्पर्धक डबल ढोलकी होणार कारण ते पुढे जाण्यासाठी काड्याच लावणार आणि हे काम कोण करतंय? तर हे सांगायची गरज नाही. खेळून हरले असते तर माझ्या मनात नक्कीच त्यांनी जागा निर्माण केली असती पण खेळलेच नाहीत तरीही चावडी म्हणते बीटीम जिंकली? बिग बॉस हा खेळावर आधारित गेम आहे. पण टास्क सोडून देणाऱ्या टीमला कोणी काही बोलत नाही, कोण योग्य आणि अयोग्य हे ठरविण्यासाठी टास्क तर खेळा!
मिरचीचे पाणी आणि धुरी यावरही आदर्शने शोमध्ये शहानिशा झाली नाही असेही परखड मत मांडले आहे. निव्वळ माझा भाऊ आहे म्हणून मी हा कार्यक्रम बघतो. काही गोष्टी खटकल्या मित्रांचे आणि चाहत्यांचे फोन आणि मेसेज येत आहेत की दादा तुम्ही बोला तुम्ही शांत का? जे घडतंय ते चुकिचं घडतंय असं प्रेक्षकांना ही वाटतंय. उत्कर्ष खेळायला गेला, रडून सहानभूती मिळवायला नाही! माझा भाऊ प्रत्येक टीका खिलाडू वृत्तीने घेतोय याचा मला अभिमान आहे. कोणत्याही टीममध्ये भेदभाव करु नका आणि प्रेक्षकांची दिशाभूल करु नका. जय भीम जय शिवराय नमो बुद्धाय. आदर्श शिंदे यांची हि प्रतिक्रिया योग्य असली तरीही बिग बॉस यावर काय निर्णय घेणार आणि हा खेळ एकमेकांना सांभाळून घेत खेळला जाईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.