सतत नवीन मुद्यावर वाद घालणारं घर म्हणजे बिग बॉसचे घर. बिग बॉसच्या घरामध्ये पूर्ण सिझन सतत टास्कवरुन आणि जिंकून येण्याच्या चुरस या मधून भांडण होताना पहायला मिळाले. अशात आता बिग बॉस १५ शेवटच्या टप्प्यात येऊन पोहचले आहे. शेहनाज गिलच्या रोमांचक भेटीमुळे रंगमंच खुलून आला खरा. मात्र सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणींनी सलमान आणि शेहनाज दोघेही अत्यंत भावून झालेले पहायला मिळाले. आता बिग बॉस १५ सध्या एका रोमांचक वळणावर येऊन पोहोचले आहे. या शोचे फायनलिस्ट जवळपास ठरले आहेत. त्यामुळे या सीझनची ट्रॉफी कोण आपल्यासोबत घरी नेणार याकडेच साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. बिग बॉसच्या घरात सध्या फक्त ५ सदस्य उरले आहेत.
प्रतीक सेहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, रश्मी देसाई, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा या स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात आपलं स्थान पक्क केलं आहे. शमिता, निशांत आणि प्रतीक हे तिघेही बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सीझनमध्ये दिसले होते. तिघेही अंतिम फेरी पर्यंत पोहचले होते मात्र ट्रॉफी जिंकण्यात त्यांना यश मिळाले नाही. आणि दिव्या अग्रवाल बिग बॉस ओटीटीची विजेती ठरली. त्यामुळे नंतर निशांत, प्रतीक आणि शमिता या तिघांना बिग बॉस १५ मध्ये येण्याची संधी मिळाली. या संधीचा फायदा तिघांनीही करुन घेतल्याचे दिसत आहे, कारण तिघेही फिनालेमध्ये पोहोचलेत. निशांत, प्रतीक आणि शमिता तिघेही संपूर्ण ताकत पणाला लावून खेळत आहेत.
अशा परिस्थितीत तिघांपैकी बिग बॉस १५ चा विजेता कोण होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जर आपण तिघांचा खेळ पाहिला तर शमिता शेट्टी, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांनी बिग बॉसच्या घरात जबरदस्त खेळ केला. टास्कमध्ये उत्साहाने भाग घेतला, प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी आपलं मत मांडलं. घरची जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आणि आता हे करत असतानाच त्यांनी फिनालेमध्येही स्थान मिळवलं आहे. करण कुंद्रा आणि प्रतीक सेहजपाल यांना आजपर्यंत प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. बिग बॉस १५ चा विजेता कोण होणार हे रविवारी ३० जानेवारी रोजी घोषित होणार आहे.