Breaking News
Home / मालिका / सततच्या वादांमुळे विशाल निकमच्या खेळावर प्रेक्षकांची नाराजी..
vishal nikam big boss serial
vishal nikam big boss serial

सततच्या वादांमुळे विशाल निकमच्या खेळावर प्रेक्षकांची नाराजी..

मराठी बिग बॉसच्या घरात सुरुवातीपासूनच जय, गायत्री आणि स्नेहा या सर्वावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती. सतत वाद घालणे, ओरडून बोलणे यामुळे बिग बॉसच्या घरातले हे सदस्य ट्रोल होताना दिसत होते. मात्र आदेशच्या एक्झिट नंतर गेल्या काही दिवसांपासून घरातील आणखी एका सदस्यावर प्रेक्षकांनी आता नाराजी दर्शविलेली पाहायला मिळत आहे. हा सदस्य आहे विशाल निकम. गेल्या काही दिवसांपूर्वी विशालचा सोनाली सोबत वाद झाला होता.

vishal nikam big boss serial
vishal nikam big boss serial

मी तुझ्याबाजूने नेहमी बोलते मग त्या बदल्यात तुही माझी बाजू घ्यावीस असं ती विशालला सांगते. तू दुसऱ्या टीमसारखं माझ्या विरुद्ध का बोललास माझं नाव का घेतलंस? असा प्रश्न सोनाली त्याला विचारते. उत्कर्षणे माझी बाजू घेतली असं सोनाली म्हणताच विशाल तिला थांबवतो आणि म्हणतो की माझं आणि उत्कर्षचं मत वेगळं असू शकतं. विशालच्या ह्या मतावर सोनालीने नाराजी दर्शवली आणि त्याच्या अशा वागण्यावरून ती भावुक झालेली दिसली. सोनाली विशालला स्पष्टीकरण देत म्हणते की, ‘तुला माणसांची किंमत नाहीये. तुझं स्टेटमेंट तुझी सिच्युएशन समोरच्या माणसांपेक्षा मोठी असते’. दुसऱ्या दिवशी सुद्धा सोनालीने विशालला हेच बोलून दाखवले त्यावेळी देखील विशाल आपलीच बाजू सांभाळताना दिसला. दरम्यान सोनाली सोबतच्या वादानंतर विशाल आणि विकास या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला, बिग बॉसने दिलेला टास्क खेळत असताना विशाल डेव्हीलची भूमिका निभावत असतो त्यादरम्यान विशालचे वागणे पाहून विकास त्याच्यावर भडकतो. ‘खेळ खेळता येत नाही मग हेच करणार तू’ अस म्हणून विशालला तू कसा वागतोएस हे सांगतो.

vishal nikam big boss season 3
vishal nikam big boss season 3

यावर विशाल प्रतिउत्तर देत, ‘मला खरंच डेव्हीलच्या रुपात नको यायला लावू’ असं विकासला चिडून बोलतो त्यावर, ‘तू डेव्हीलच आहेस यायची गरज नाहीये’ असं विकास त्याला ओरडून सांगतो. बिग बॉसच्या घरात विशाल आणि विकास यांच्यात चांगली मैत्री जमली होती. सुरुवातीला टास्कमध्ये हे दोघेही एकमेकांना चांगली साथ देताना दिसले. विकास नेहमी संयमी भूमिकेत पाहायला मिळाला मात्र आता विशालच्या अशा वागण्याने त्यांच्यात सतत वाद होताना दिसत आहेत. त्यामुळे प्रेक्षक देखील विशालच्या वागण्यावर उलटसुलट प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. विशाल आता हळूहळू त्याचे रंग दाखवायला लागलाय आणि तो खूप बदलला आहे असेच मत प्रेक्षकांकडून व्यक्त होताना दिसत आहे. टास्कदरम्यान झालेले हे वाद आता पुढेही असेच टिकून राहणार का हे येत्या काही दिवसातच बिग बॉसच्या घरात पाहायला मिळेल पण विकासने संयमी भूमिका दाखवून कुठलेही वाद न वाढवता टास्क खेळावेत असेच मत आता त्याच्या बाबत व्यक्त केले जात आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.