Breaking News
Home / बॉलिवूड / बंटी और बबली २ चित्रपटातली सुंदर मराठमोळी अभिनेत्री आहे माजी मुख्यमंत्र्याची नात
beautiful actress grand daughter of chief minister
beautiful actress grand daughter of chief minister

बंटी और बबली २ चित्रपटातली सुंदर मराठमोळी अभिनेत्री आहे माजी मुख्यमंत्र्याची नात

आजवर अनेक मराठमोळ्या कलाकारांनी दमदार अभिनयाने बॉलिवूड चित्रपटात आपले नाव कोरले. १९ नोव्हेंबरला बंटी और बबली २ हा बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित होत असून चित्रपटातील मराठमोळी अभिनेत्री शर्वरी वाघ ही मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. प्रोमो मधून सर्वांचे लक्ष वेधून घेणारी आकर्षक चेहऱ्याची हि सुंदर अभिनेत्री शर्वरी वाघ नक्की आहे तरी कोण असा प्रश्न पडणे साहजिक आहे, आज तिच्याबद्दलच्या माहीत नसलेल्या खास गोष्टी जाणून घेऊयात. ​शर्वरी ही ​मूळची ​मुंबईची, रुपारेल कॉलेज मधून शिक्षण पूर्ण केले. तिचे वडील शैलेश वाघ हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून आई नम्रता वाघ या आर्किटेक्ट आहेत.

actress sharvari wagh banti aur babli 2
actress sharvari wagh banti aur babli 2

शर्वरीची बहीण कस्तुरी वाघ ही देखील आर्किटेक्ट असून धाकट्या भावाचे नाव अर्णव वाघ असे आहे. शर्वरीची आई नम्रता वाघ या माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांची मुलगी आहे. शर्वरीने वयाच्या १६ वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. कॉलेजमध्ये असताना क्लीन अँड क्लिअर फ्रेश फेस स्पर्धेमध्ये तिने सहभाग घेऊन विजेतेपद पटकावले होते. जेफ गोल्डबग स्टुडिओच्या विकेंड थिएटर वर्कशॉप मधून अभिनयाचे धडे गिरविला नंतर व्यावसायिक जाहिरातीतून तिला संधी मिळाली. चित्रपटात चांगली भूमिका मिळवण्यासाठी जवळपास ५ वर्षे ती ऑडिशन देत राहिली. शेवटी बॉलिवूडच्या ३ चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शनाची भूमिका तिला मिळाली. प्यार का पंचनामा, बाजीराव मस्तानी, सोनू की टिट्टू की स्वीटी अशा गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटासाठी तिने असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम सांभाळले. द फरगॉटन आर्मी आझादी के लिये या वेब सिरीज मधील तिची भूमिका अतिशय दमदार होती, प्रेक्षकांनी तिचे भरभरून कौतुक देखील केले होते.

sharvari wagh sunny kaushal
sharvari wagh sunny kaushal

शर्वरी ही विकी कौशलचा भाऊ सनी कौशल ह्याला डेट करत असल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूड सृष्टीत पाहायला मिळतात. एका मासिकाच्या कव्हर पेजवर शर्वरी आणि सनी कौशल एकत्रित झळकले होते, तेव्हापासून हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. २०२० साली शर्वरी द फरगॉटन आर्मी या मिनी सिरीजमध्ये मायाच्या भूमिकेत दिसली. येत्या १९ नोव्हेंबर २०२१ रोजी शर्वरीचा प्रमुख भूमिका असलेला बंटी और बबली २ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने शर्वरीला तुफान पब्लिसिटी मिळाली आहे. यापूर्वी देखील बॉलीवूडमध्ये अनेक कलाकार हे राजकीय घराण्यातून आलेले आहेत. पण अभिनेत्री म्हणून माजी मुख्यमंत्र्याची नात पदार्पणाची हि पहिलीच वेळ असावी, पण राजकीय घराणं सोडून ती अभिनयात आणखीन कितपत यश मिळवते हे येत्या काही काळात स्पष्ट होईल. बॉलीवूड अभिनेत्री शर्वरी वाघ हिला तिच्या पुढील वाटचालीसाठी कलाकार टीम कडून खूप खूप शुभेच्छा…

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.