बिग बॉसच्या चावडीवर नेहमीप्रमाणे ए टीमला महेश मांजरेकर यांनी धारेवर धरले मात्र ही टीम यातून काहीच बोध घेत नाही अशीच चिन्ह दरवेळी पाहायला मिळाली. स्नेहा, मीरा, गायत्री यांना नेहमीच मांजरेकरांनी झापलं आहे मात्र तरीदेखील एका कानानी ऐकायचं दुसऱ्या कानानी सोडून द्यायचं असच ह्यांच्याबाबतीत घडत आहे असं प्रेक्षकांचं देखील म्हणणं आहे. त्यामुळे बिग बॉसच्या चावडीवर अनेकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.

कालच्या भागात विशाल मीनल आणि सोनाली सोबत कसा वागतो हे समजावून सांगत होते त्यावेळी तू त्यांची माफी मागायला हवीस असं ते म्हणाले . गेल्या काही दिवसांपासून विशाल सोनाली आणि मीनलसोबत खूप आवाज चढवून बोलत होता त्याचमुळे त्याचे हे वागणे लोकांना आवडणार नाही अशी समजूत महेश मांजरेकर विशालला घालत होते. मात्र ह्या सगळ्याचा अर्थ त्याने वेगळाच काढला असल्याचे दिसून येते. विशालच्या बाजूने कोणीच नाही असं मत त्यानं मांडलं आहे म्हणून तो एकटा राहून रडताना दिसत आहे. “जवळची माणसंच जास्त त्रास देतात.. हे नाहीये असं, कोणी नाहीये आता इथे माझं…मी कोणत्याही ग्रुपचा हिस्सा नाहीये, आजपासून… आत्तापासून…” असे म्हणत त्याने आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली आहे. ह्या निर्णयामुळे विशाल आता एकाकी पडल्याचे दिसून येत आहे मात्र असे असले तरी विशालने हा चुकीचा समज करून घेतला असल्याचे त्याच्या चाहत्यांनी म्हटले आहे. विशाल खूप चांगला खेळाडू आहे तो सगळ्यांशी खूप चांगला वागतो आहे मात्र गेल्या काही दिवसांपासून तो आपल्याच ग्रुपला टार्गेट करत आहे त्यांच्याबद्दल वाईट बोलत आहे. मैत्रीत वाद होतात खटके उडतात मात्र लगेचच एकत्रही येतात. परंतु विशाल येथे खूप चुकीचा वागतोय असं अनेकांचं मत आहे.

विशालने सोनाली आणि मिनलसोबत चांगलं वागावं असेच त्याला महेश मांजरेकर यांनी देखील सूचित केले आहे जेणेकरुन तो बाहेर देखील लोकांची वाहवा मिळवू शकेल. पण याचाच उलट अर्थ घेतल्याने विशालने घरातील सदस्यांपासून वेगळं पडल्याचं म्हटलं आहे. विशालचा हा निर्णय कितपत योग्य आहे हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल परंतु आपल्या टीमशी प्रामाणिक राहणं हे त्याने जाणलं पाहिजे. तूर्तास बिग बॉसच्या घरातून बाहेर पडण्याचा प्रक्रियेत सोनाली, गायत्री सुरक्षित राहिल्या आहेत त्यामुळे कोणता सदस्य ह्या आठवड्यात बाहेर निघणार हे लवकरच स्पष्ट होईल.