बिग बॉसच्या घरात ह्या आठवड्यात सर्वच सदस्यांनी खूप चांगले टास्क खेळले होते. त्यामुळे ह्या आठवड्यात कुठलाही राडा आणि आरडाओरडा फारसा पाहायला मिळाला. खास बाब म्हणजे टास्क खेळत असताना विशालने जयवर चांगली पकड जमवली होती जयला विशालच्या तावडीत सापडलेले पाहून बिग बॉसच्या प्रेक्षकांनी मात्र विशालचे खूप कौतुक केलं आहे. विकास म्हणाला तसं सगळ्यानीच आज आपला राग बाजूला ठेवून आणि आपल्या टीमला धरूनच खेळ खेळला होता या सर्वांचं कौतुक करताना तो पुढे आलेला दिसला.
विशेष म्हणजे शेवटचा कॅप्टन पदाचा मान मिनलने पटकवला असल्याने ती डायरेक्ट फायनलमध्ये पोहोचली आहे. काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी आठही सदस्यांचं कौतुक केलं आणि त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. स्नेहा, तृप्ती आणि आदिश हे सर्व जण बाहेरून आलेले सदस्य आहेत. घरात पुन्हा एकदा एन्ट्री घेतल्यावर त्यांनी आठही सदस्यांना धारेवर धरले होते. त्यावरून महेश मांजरेकर काहीशे नाराज झाले. बाहेरचे तीन सदस्य घरातील सदस्यांचा अपमान करतात तेव्हा तो मी माझा अपमान समजतो असे ते कौतुकानं म्हटले. ह्या सदस्यांना फक्त मी बोलू शकतो बाहेरच्यांनी त्यांना वाईट बोलायचं नाही कारण मी त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. मी त्यांच्याबरोबरच या गेमचाही एक भाग आहे. हे आठही जण माझे आहेत आणि त्यांना कोणीच हर्ट नाही करायचं.
बाकीच सगळं ठीक आहे पण तुम्ही तिघे ह्यांच्यावर राग नका काढू असे म्हणत महेश मांजरेकर यांनी स्नेहा, तृप्ती आणि आदिशला समजावून सांगितले. तृप्ती ताईंचा आवाज खूप मोठा आहे घरातील सदस्यांना चहा बनवायचा आदेश देत असताना त्या खूप मोठमोठ्याने ओरडत होत्या त्यावरून महेश मांजरेकरांनि त्यांना समज दिली की त्यांचा आवाज बिग बॉसच्या घराबाहेरील टीमला देखील ऐकू यायचा आणि चहा कोणी मागवलाय म्हणून चौकशी करायचे. तर स्नेहा आणि आदिशच्या वागण्याला देखील महेश मांजरेकर यांनी खडेबोल सुनावले होते. आजच्या भागात कोणता सदस्य नॉमीनेट होणार याकडे सगळ्यांचे लक्ष्य आहे. त्यानंतर पुढच्या आठवड्यात देखील आणखी एक सदस्य बाद झाल्यावर फायनल मध्ये कोणकोणते सदस्य असतील याची उत्कंठा प्रेक्षकांना लागली आहे.