गेल्या आठवड्यात तृप्ती ताई बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या त्यावेळी घरातील सर्वच सदस्य खूपच भावूक झालेले दिसले. घरातून बाहेर पडल्यावर तृप्ती ताईंनी मीडियाला मुलाखती दिल्या त्यात त्यांनी बिग बॉसच्या घरात राहून काय काय अनुभव घेतला हे देखील सांगितले. इतर सदस्यांबाबत देखील त्यांनी काही सूचना दिल्या आहेत जय आणि उत्कर्ष यांच्यासोबत राहिल्या नंतर त्यांनी त्या दोघांसाठी एक सूचना देखील दिली आहे त्या नेमके काय म्हणाल्या ते जाणून घेऊयात..
घरातील प्रमुख या नात्याने मी त्या घरात सर्वकाही केलं. मी जोपर्यंत त्या घरात आहे तोपर्यंत कोणीही उपाशी राहू नये ही काळजी कायम घेतली. माझ्या विरोधात जे होते त्यांना वाटलं की मी पुढं पुढं करतीये परंतु मी जेव्हा घरातून बाहेर पडले तेव्हा तेच जास्त भावुक झाले होते. बिग बॉसच्या घरात मी आहे तशीच सर्वांसमोर आले केवळ कॅमेरा समोर आहे आणि मला चांगलं वागायचंय हा हेतू माझा मुळीच नव्हता, मी जशी आहे ज्या प्रकारे मी घरात वागले तसे मला कोणी स्वीकारेल की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. केवळ मराठी बिग बॉससाठी नाही तर हिंदी बिग बॉसमध्ये देखील मला बोलवलं होतं असं त्या आवर्जून म्हणाल्या. बिग बॉसचा आवाज महिलांचा असावा अशीही मागणी त्यांनी केली होती. कोणी महिला आपल्याला ऑर्डर देतये हे भारी वाटेल असे मी मत मांडलं होतं. यावर भविष्यात बिग बॉसचे आयोजक नक्कीच विचार करतील असे आश्वासन मिळाले आहे. मला बिग बॉसच्या घरात आदर मिळाला तिथं मला ताई शिवाय प्रत्यक्ष नावाने कोणीच हाक मारली नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर त्यांनी एक विधान केलं की जय आणि उत्कर्ष खूप चांगले खेळतात ते दोघेही बिग बॉसच्या अंतिम पाच मध्ये जाऊ शकतात मात्र त्यांनी ओव्हरकॉन्फिडन्स राहू नये असे मला वाटते.
जय आणि उत्कर्षबाबत त्या असेही म्हणाल्या की, जर तुम्ही असे वागलात तर तुम्हाला एलिमीनेशन मधून कधी बाहेर फेकले जाईल हे तुम्हाला समजणार सुद्धा नाही. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर मी राजकारणात प्रवेश करेल असे त्यांनी नमूद केले. मी नेहमीच महिलांच्या बाजूने उभी राहिली आहे त्यांना तेवढा सन्मान मिळावा न्याय मिळावा यासाठी मी नेहमीच प्रयत्नात असते. यापुढे राज्यातील गावागावात, तालुक्यात मी यात्रा काढणार आहे. लोकांची मानसिकता बदलून त्यावर नियोजन करणार आहे प्रत्येकाच्या घरातली मुलगी सुरक्षित राहिली पाहिजे आणि त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्यासाठी मी बिग बॉसच्या माध्यमातून माझं मत मांडलं जेणेकरून ह्या गोष्टीवर लोकं आपणहून पुढाकार घ्यायला तयार होतील. प्रत्येक घरातून आपल्या मुलाला चांगली शिकवण मिळाली की तो आपोआप महिलांचा सन्मान करेल. यासाठी मला राजकारणातून एखादी संधी मिळाली तर योग्य वेळी मी ती संधी निश्चितच स्वीकारेल असंही त्या म्हणाल्या.