आई कुठे काय करते या मालिकेत अनिरुद्ध हे जरासे विरोधी भूमिका दर्शवणारे पात्र आहे. मात्र अनिरुद्धवर प्रेम करणारे प्रेक्षक मिलिंद गवळी यांना त्यांच्या अभिनयाची नेहमी पावती देत असतात. ही भूमिका साकारताना खरंतर काही प्रेक्षकांकडून टीकाही केली जाते. पण आपल्या कामाची एक पावती समजूनच ते पुढे चालत राहिले आहेत. अशातच अनिरुद्धची बाजू सावरणाऱ्या कांचन आज्जीचा देखील अनेकांना राग येतो. पण ती एक आई आहे आणि ती आपल्या मुलाची बाजू कायम सावरताना पाहायला मिळाली आहे. त्या अरुंधतीच्या कायम विरोधात वागल्या आहेत आणि अनिरुद्धला त्यांनी पाठीशी घातलं आहे.
अशातच या आईबद्दल मिलिंद गवळी यांनी भावना व्यक्त केलेल्या पाहायला मिळत आहेत. आपल्या पोस्टमध्ये कांचनआईची भूमिका निभावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री अर्चना पाटकर यांच्याबद्दल लिहिताना मिलिंद गवळी म्हणतात की, एकेकाळी कर्तृत्ववान अनिरुद्ध आता फारच असह्य झाला आहे. त्याची व्यथा तो सतत मांडत असतो. अरुंधतीला यश मिळाले आहे, ती खूप पुढे निघून गेलेली आहे. म्हणून त्याला त्रास होतो, असं जे सगळ्यांना वाटतं तसं नाही आहे. अमिताभ बच्चन जया भादुरीचा “अभिमान” सिनेमासारखं नाही असं तो म्हणतोय. हे सगळं तो जीव तोडून सांगायचा प्रयत्न करतो आहे. त्याची आई सोडल्यास, म्हणजेच कांचन आई सोडल्यास दुसरा कोणाचाही त्याच्यावर आता भरोसा, विश्वास राहिलेला नाहीये.
शेवटी कांचन आई ती बिचारी आई आहे, तीच आपल्या मुलाला आधार देणार. आई मुलांवर निस्वार्थ प्रेम करत असते, मग ती अनिरुद्धची आई असली तरी शेवटी ती आईच आहे. अर्चनाताई पाटकर यांनी हा सीन खूप छान केला. इमोशनल सीन त्या खरच खूपच छान करतात. सीन सुरू व्हायच्या आधी त्या मिश्किलपणे हसत असतात. पण एकदा का सीन सुरू झाला, की चटकन त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांचे डोळे भरून येतात, आवाजात एक वेगळाच कंप निर्माण होतो. समोरच्याच्या काळजाला जाऊन तो असा भिडतो की समोरच्या कलाकारांचे ही डोळे भरून येतात. या सीनमध्ये त्यांच्याकडे पाहिलं आणि माझेही डोळे भरून आले.
मालिकेत एकत्रित काम करत असताना कलाकारांमध्ये एक छान बॉंडिंग जुळून आलेलं असतं. हे बॉंडिंग विरुद्ध भूमिका साकारणाऱ्या कलाकारांमध्येही तेवढंच छान जुळलेलं असतं. सेटवर प्रत्येक कलाकाराची आपुलकीने चौकशी करणं असो वा आजारपणात दिलेली साथ. याचा प्रभाव मालिकेतूनही प्रेक्षकांना अनुभवायला मिळतो. त्याचमुळे संजना आणि अरुंधतीचे दोन भिन्न पात्र निभावणाऱ्या कलाकारांमध्येही मैत्रीपूर्ण संबंध तयार झालेले आहेत हेच या मालिकेच्या यशाचे खरे गमक आहे.
“ मग ती अनिरुद्ध ची असली तरी ती आईच आहे “
लोकांच अफाट प्रेम आणि राग भरभरून मिळतोय….
त्याबद्दल खुप खुप धन्यवाद ….
कोणत्याही कलाकारासाठी हे खुप बहुमोल गोष्ट आहे …🙏😊
असच कायम आमच्या वर प्रेम असु दया …😊