Breaking News
Home / मराठी तडका / यापुढे जर पुन्हा चूक घडली तर महाराष्ट्रातून तडीपार तर करूच.. चुकीला माफी नाही म्हणत अभिनेत्रीची आगपाखड
mega ghadge
mega ghadge

यापुढे जर पुन्हा चूक घडली तर महाराष्ट्रातून तडीपार तर करूच.. चुकीला माफी नाही म्हणत अभिनेत्रीची आगपाखड

काही दिवसांपूर्वी मराठी चित्रपट अभिनेत्री आणि लावणी नृत्यांगना मेघा घाडगे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. एका कार्यक्रमात गौतमी पाटील हिने लावणीच्या नावाखाली अश्लील कृत्य केले होते. त्यावरून मेघा घाडगे यांनी संताप व्यक्त केला होता. जो कार्यक्रम बघायला लहान मुलं, मुली, महिला येतात त्यांच्यासमोर असा डान्स करणे हे अत्यंत घृणास्पद आहे. मला सुद्धा तिचा व्हिडीओ पाहताना लाज वाटली होती. अशा कार्यक्रमाचे जे कोणी आयोजक असतील मग ते मोठे राजकारणी असुदेत नाहीतर कोणी मोठी व्यक्ती त्यांच्यावर देखील मेघा घाडगे यांनी राग व्यक्त केला होता.

mega ghadge
mega ghadge

आणि गौतमी विरोधात पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवण्याचा ईशारा दिला होता. मेघा घाडगे यांनी असा इशारा देताच गौतमीने समोर येऊन सर्वांची जाहीरपणे माफी मागितली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष रुपाली ठोंबरे यांनी देखील गौतमीला समज दिली होती. मात्र अजूनही महाराष्ट्रात लावणीच्या नावाखाली अश्लील कृत्य केले जात आहे हे पाहून त्या डान्स करणाऱ्या मुलींचा त्यांनी चांगलाच समाचार घेतलेला पाहायला मिळतो आहे. महाराष्ट्रात लावणीला एक आदराचं स्थान आहे. ही लोककला जपली जावी म्हणून मेघा घाडगे, सुरेखा पुणेकर यांच्यासारखे आणखी कलाकार मंडळी आजही प्रयत्न करत आहेत. अशातच असे घागरा चोली घालून अश्लील कृत्य करणाऱ्या आणखी काही मुलींना त्यांनी समज देण्याचा प्रयत्न केला आहे.

lavani girls
lavani girls

‘इथून पुढे अशी चूक घडली तर महाराष्ट्रातून त्यांना तडीपार तर करूच, पण तोंडाला काळे फासून टक्कल करून गाढवावरून धिंड काढू. मग चुकीला माफी नाही.’ महाराष्ट्राच्या लोककलेचा, लावणीचा जर या पुढे कोणीही अपमान किंवा लावणीच्या नावाखाली आयटम सॉंग करताना आढळले तर घरात घुसून मारुच पण कायमचं कुठेही काम करता येणार नाही अशी गत करू.’ असा इशाराच त्यांनी दिलेला पहायला मिळतो आहे. या मुलींना पुण्यात एकत्रित बोलवण्यात आले आणि त्यांना जाहीरपणे माफी मागण्यास सांगितले. ईथुनपुढे आमच्याकडून अशी चूक घडणार नाही असे आश्वासन या मुलींनी दिले.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.