Breaking News
Home / मराठी तडका / राजश्री ढाले पाटील फेम श्रुती अत्रे बिग बॉसच्या घरात जाणार?
shruti atre shivani sonar
shruti atre shivani sonar

राजश्री ढाले पाटील फेम श्रुती अत्रे बिग बॉसच्या घरात जाणार?

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल होणाऱ्या बिग बॉस मराठीशोच्या ४ थ्या सीझनची जोरदार चर्चा सुरू आहे. तीन महिन्यांसाठी या घरात बंद होण्याकरिता कोण कोण सेलिब्रिटी येणार हे अजून उघड झालं नाही. पण आता यामध्ये अभिनेत्री श्रुती अत्रे हिचं नाव पुढे आलंय. श्रुतीच्या चाहत्यांसाठी ही पर्वणी असेल. शंभर दिवस अशा घरात रहायचं जिथे ना मोबाइल फोन ना वाचण्यासाठी रोजचा पेपर. फक्त या घरातील सदस्य, त्यांच्यासोबत नवे टास्क, खेळ. तुम्ही कसे वागता, बोलता, एकमेकांशी जुळवून घेता यावर करडा पहारा. त्यातून शंभर दिवसांनी निकाल ठरणार. २ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या बिग बॉस मराठी शोची चर्चा आता चांगलीच रंगली आहे.

shruti atre shivani sonar
shruti atre shivani sonar

बिग बॉसच्या घरात कोणकोणते सेलिब्रिटी असतील याची उत्सुकता आणखी वाढत चालली आहे. आता या यादीत नाव आलं आहे ते अभिनेत्री श्रुती अत्रे हिचं. पण श्रुतीने होकार दिलाय नाही हे गुलदस्त्यात आहे. श्रुतीला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी तिचे चाहते मात्र आतूर आहेत. राजा राणीची गं जोडी या मालिकेतील राजश्री ढाले पाटील या भूमिकेने श्रुतीचा ठसकेबाज अंदाज प्रेक्षकांना पाहिला. साताऱ्याची श्रुती आता लग्नानंतर पुणेकर तर कामाच्या निमित्ताने मुंबईकर आहे. बापमाणूस या मालिकेतील सुयश टिळकची नायिका गीता हे पात्रही श्रुतीच्या चाहत्याच्या विशेष पसंतीचं. साधीसरळ गीता साकारल्यानंतर थेट राजश्री ढाले पाटील ही खलनायिकाही श्रुती अत्रे हिने तितक्याच ताकदीने वठवली.

shruti atre
shruti atre

पण गेल्या काही दिवसांपासून तिची राजा राणीची गं जोडी या मालिकेतील भूमिका पडद्याआड गेली आहे. त्यामुळे श्रुतीचे चाहते तिला पुन्हा ऑनस्क्रिन पाहण्यासाठी उत्सुक आहेत. बिग बॉस मराठी शोमध्ये सहभागी होण्यास श्रुतीने होकार दिला तर चाहत्याची ही इच्छा लवकरच पूर्ण होईल. बिग बॉस मराठीच्या चौथ्या सीझनमध्ये कोण कोण सेलिब्रिटी येणार याबाबत रोज एक नवी माहिती येत असते. गेल्याच आठवड्यात अनिकेत विश्वासराव आणि स्नेहा चव्हाण ही जोडी येणार असल्याची चर्चा होती. या जोडीचा घटस्फोट झाला आहे. स्नेहाने अनिकेतवर छळवादाची केस दाखल केल्याने हे प्रकरण गाजलं होतं. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या सीझनमध्येही स्नेहा वाघ आणि आविष्कार दारव्हेकर हे घटस्फोटित जोडपं होतं.

सुंदरा मनामध्ये भरली फेम आभ्या म्हणजेच समीर परांजपे हा देखील बिग बॉसच्या घरात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शो सुरू होण्यासाठी आता १५ दिवसच उरले आहेत. नव्या पर्वात होस्ट महेश मांजरेकर यांनी काही बदल केले आहेत. घरातील रचना कशी असेल, खेळ कोणते असतील, टास्क काय असतील, कोणत्या परीक्षा द्याव्या लागतील अशा उत्सुकता आहेतच. पण खरी मजा येणार आहे ती या घरात कोण सेलिब्रिटी येणार त्यावरून. श्रुती अभिनेत्री म्हणून तर प्रेक्षकांनी पाहिली, आता ती व्यक्ती म्हणून कशी आहे? तिचा जीवनप्रवास कसा आहे? सगळ्या सुविधांपासून १०० दिवस लांब राहताना श्रुती कशी वागू शकते. तिच्या व्यक्तीमत्वाचे पैलू कसे आहेत हे सगळं पाहण्याची संधी तिच्या चाहत्यांना मिळू शकते.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.