मराठी बिग बॉसच्या घरातून काल विकास सावंतची एक्झिट झाली. यावेळी विकासला निरोप देताना अपूर्वा नेमळेकर खूप भावुक झालेली पाहायला मिळाली. विकास सोबतची मैत्री आणि त्याच्यासोबत केलेली मस्ती कधीही विसरू शकणार नाही असे मत तिने व्यक्त केले. काल बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकर यांनी विकासची बाजू घेतली होती. विकास माझ्या विरुद्ध बोलतो असे किरण माने यांनी म्हटले होते. त्यावेळी आम्हाला असं कधीच वाटलं नाही की त्याने तुझी चुगली केलीये. विकास फेअर खेळला आहे, त्याने या घरात राहून प्रेक्षकांचे मनोरंजन देखील केलेले दिसले.
विकास टॉप पाचच्या यादीत असायला हवा होता, असे मत प्रेक्षकांनी व्यक्त केले होते. मात्र ह्या आठवड्यात त्याच्या एक्झिटमुळे प्रेक्षकांनी बिग बॉसच्या या निर्णयावर नाराजी दर्शवली आहे. बिग बॉसच्या घरात प्रत्येक जण आपल्या खाजगी आयुष्यातील घडलेल्या घटनांबद्दल व्यक्त होताना दिसतात. अपूर्वा नेमळेकर हिचे आयुष्य देखील अशाच काही गोष्टींनी चर्चेत आलेले आहे. खूप आधी वडिलांना गमावणे असो वा मालिकेतील कलाकारांसोबत झालेले वाद. वा वैवाहिक आयुष्यात घटस्फोट घेतल्यामुळे देखील ती कायम चर्चेत राहिली मिळाली आहे. आपण आयुष्यात खूप काही गमावलंय असे ती भावनिक होत राखी सोबत बोलताना दिसली आहे. अपूर्वाची नाईट कॅप कोणीतरी लपवून ठेवली यावरून ती राखी सोबत बोलताना दिसली.
अपूर्वा म्हणते की, ज्यांनी कोणी माझी नाईट कॅप किंवा शॉवर कॅप घेतली आहे. ना तुला वाटतं त्या कॅपमुळे मला इतका फरक पडेल, आयुष्यात खूप काही गमावलंय मी खूप काही. इतकी मटेरिअलिस्टिक अपूर्वा नेमळेकर नाही. मला काहीही फरक पडत नाही, सगळं घे माझ्या आयुष्यातलं. मला जे नको द्यायचं होतं ना मला जे उराशी धरून ठेवायचं होतं. ना तेही गमावलेली व्यक्ती आहे मी, एक कॅप नाही जज करू शकत यार, माझं मन खूप मोठं आहे. माझं अस्तित्व तर नाही ना घेऊ शकत तू. यानंतर राखी अपूर्वाला कॉफीवरून वाद झालेल्याची आठवण करून देते. तेव्हा अपूर्वा भावनिक होऊन म्हणते की, तुला एक सांगू राखी, मला आनंद आहे की तू या घरात आहेस.
मी जे काही आयुष्यात नाही बघितलं ना ते तुझ्याकडून मला शिकायला मिळालं आहे. आपला या घरात अजून २५ दिवसाचा प्रवास आहे आणि माझी अशी ईच्छा आहे की तू शेवटपर्यंत या घरात रहावीस. कारण तु जे काही माझ्यासोबत वागशील त्यातून मी स्वतःला एक व्यक्ती म्हणून घडवत जाईल. मी या घरातून बाहेर पडेल ना तेव्हा लोक मला असं काही बोलतील. तेव्हा मला त्याचं वाईट नाही वाटणार, कारण मी तुझ्याकडून हे सगळं शिकून गेलेली असेल. जेव्हा माझ्या जवळच्या व्यक्ती असं काही माझ्या विरोधात बोलतात. तेव्हा त्या मनाला लागुण घ्यायच्या नाही, याच गोष्टी मला तुझ्याकडून शिकायच्या आहेत, ते तू करतेस म्हणून थँक यु.