बॉलिवूडमध्ये अनेक वेळा अशा घटना घडतात ज्या क्वचितच माहित पडतात, चित्रपट पाहताना आपण खूप निवांत पाहतो, त्यातील प्रत्येक सीनचा पूर्णपणे आनंद घेण्याचा आपला प्रयत्न असतो.. काही सीन शूट करताना कलाकारांची किती झोप उडते ते फक्त त्यांनाच माहीत असते. काही वेळा चित्रपटात फाईट सिन किंवा घातक स्टंट करायचे असतात, तर काही वेळा भावनिक अभिनय साकारायचा असतो. कलाकाराला आपल्या जीवनातील सर्व गोष्टी विसरून चित्रपटातील भूमिका जगावी लागते. सिनेमातील हिरोला रोमँटिक सीन देखील शूट करावे लागतात तर काही वेळा कलाकारावर चित्रकथेत दुःखद घटनेला सामोरे जावे लागत असतानाही प्रेक्षकांना हसवण्यासाठी विनोदी भूमिका साकारावी लागते.
असाच एक रंजक किस्सा आपल्या सुपरस्टार अमीर खान सोबत घडला होता. आपल्या वैविध्यपूर्ण अभिनयातून भरपूर चाहते कमावले, आमीर हा लाखो तरुण तरुणींच्या हृदयांची धडकन आहे. त्याचे जवळपास सर्वच चित्रपट गाजले असून त्याच्या विशेष शैलीतील भूमिकांमुळे लोकप्रिय झाला आहे. आमीरचा राजा हिंदुस्थानी, इश्क, मन, दंगल, लगान, दिल, गजनी, दिल चाहता है, हम है राही प्यार के, थ्री इडियट्स, मेला अशा अनेक चित्रपटात त्याने अफलातून भूमिका केल्या. प्रत्येक चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करण्याचा प्रयत्न प्रेक्षकांना भुरळ घालतो. अमीर ने इथवर पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे, सुरुवातीला स्वतःच्या चित्रपटाचे पोस्टर चिटकवण्याचे काम देखील त्याने केले आहे. आयुष्यातील अनेक चढ उतार पाहिल्या नंतर प्रचंड मेहनतीने तो आज सुपर स्टार बनला आहे. अभिनय क्षेत्रात मुरलेला सर्वांचा लाडका आमीर एकदा एका किसिंग सीन साठी घामेघूम झाला होता. आमीर खानचा राणी मुखर्जी सोबतचा सर्वश्रुत ब्लॉक बस्टर चित्रपट ” गुलाम “, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला. चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कमाई देखील केली. या चित्रपटात राणी मुखर्जी आणि आमीर खान जोडीने खूपच सुंदर अभिनयाचे प्रदर्शन केले, गुलाम मधील दोघांची केमिस्ट्री सर्वांना खूप आवडली. हा चित्रपट ७ करोडच्या बजेट मध्ये तयार केला होता आणि या चित्रपटाने जवळपास ३४ कोटींचा टप्पा पार केला.
एका शूटिंग दरम्यान आमीर सोबत घडलेला एक किस्सा आज खूपच व्हायरल होत आहे. ९०च्या दशकातील काही बोल्ड अभिनेत्रींपैकी पूजा बेदी ही एक सुंदर अभिनेत्री. आमीर आणि पूजा यांचा एकत्रित सर्वात पहिला चित्रपट जो जीता वही सिकंदर. या चित्रपटात त्या दोघांनीही कॉलेज तरुणाच्या भूमिका सुंदररित्या साकारल्या. त्या दोघांमध्ये चित्रपटाच्या कथानकावर आधारित एक किसिंग सीन प्ले केला होता, यानंतर आतंक ही आतंक या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा किसिंग सीन केला होता. हा सीन शूट होत असताना सर्व क्रू मेंबर्स निवांत होते तरीही हा सीन शूट करतेवेळी आमीर आणि पूजाची अवस्था खूप विचित्र झाली होती. एका मुलाखतीत सांगताना पूजा म्हणाली की हा सीन शूट करताना आमीर आणि मी खूप गोंधळलेले होतो. सेटवर चित्रपटातील दिग्ग्ज कलाकार रजनीकांत, जुही चावला, कबीर बेदी, ओम पुरी, रिटा भादुरी, दिलीप ताहिल, सुहास जोशी, गोगा कपूर, रझा मुराद उपस्थित होते. या सर्वांच्या उपस्थितीत आमीर आणि माझ्यामध्ये एक उत्तेजक लव्ह मेकिंग सीन शूट करायचा ठरला होता.
पूजा पुढे म्हणाली, याआधी जो जीता वही सिकंदर या चित्रपटात दोघांचा किसींग सीन होता. पण आतंक ही आतंक या चित्रपटात किसिंग सीन देताना मात्र आमीरची स्थिती अस्वस्थ होती, मी देखील थोडी नर्व्हस फील करत होते. किसिंग सिन काही केल्या पूर्ण होत नव्हता, रिटेक वर रिटेक चालू होते.. दोघेही अक्षरशः घामाघूम झाले होते, का कुणास ठाऊक पण दोघांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत नव्हता, कधी नव्हे एवढे दडपण सेट वरील सर्वांनी अनुभवले.. मुरलेल्या कलाकरांकडून अशा गोंधळलेली स्थिती डायरेक्टर दिलीप शंकर यांच्यासाठी खूपच अनपेक्षित होती. खूप साऱ्या जणांनी सीन शूट होण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि शेवटी कसा बसा किसिंग सिन पूर्ण झाला.. यानंतर डायरेक्टरने आम्हा दोघांना एका रूम मध्ये बसण्यास सांगितले, थोडा वेळ आम्ही दोघेही अगदी शांत बसलो होतो. एकमेकांना फक्त बघत बसलो होतो, थोडा वेळ असाच गेला. मग आमीरने माझ्याकडे पाहिले आणि चल बुद्धिबळ, चेस खेळूया म्हणाला.. यामुळे त्यांच्यातील टेन्शन खूपसे निवळले गेले.
त्यानंतर मग मात्र आमच्या दोघात चांगली मैत्री झाली. हा रंजक किस्सा खूप लोकांना माहीत नव्हता, यावर आमीरची प्रतिक्रिया खूप वेगळी होती. फिल्म गुलामबद्दल बोलायचे झाले तर राणी मुखर्जीचा हटके लूक आणि अभिनय खूप लोकप्रिय झाला होता. यामध्ये फिल्मचा क्लायमॅक्स शूट करण्यास तब्ब्ल १२ दिवस लागले होते. फिल्ममध्ये आमीर ने खलनायकाचा रोल प्ले केलेल्या शरत सक्सेनाला खूप मारले होते आणि तो सुद्धा अगदी रक्तबंबाळ झालेला दाखवला होता, या सिन मधील दोघांचा अभिनय खूपच गाजला ज्यामुळे चित्रपटाला यशाचा अनोखा टप्पा गाठता आला. आमीरचे प्रत्येक चित्रपट खूप छान आणि वैशिट्यपूर्ण असतात, त्याचा अभिनय नेहमी नैसर्गिक वाटतो.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून त्याने किरण राव सोबत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांना केलेली मदत पैशात मोजण्यापलीकडची आहे. अनेक उध्वस्त गावांना त्याने पाणीमय केले आहे, यासाठी गावकऱ्यांनी श्रमदान करावे एवढीच माफक अपेक्षा नवीन गावांना प्रेरणादायी ठरली आहे. त्याच्या या निस्वार्थ कार्यासाठी रसिक प्रेक्षकांसोबत संपूर्ण महाराष्ट्रजन ऋणी आहे. मित्रहो आजच्या लेखातील आमीरचा किस्सा तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका.