Breaking News
Home / मालिका / तारक मेहता.. मधील बापूजी उर्फ चांपकलाल यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर..
amit bhatt wife kriti bhatt
amit bhatt wife kriti bhatt

तारक मेहता.. मधील बापूजी उर्फ चांपकलाल यांची खऱ्या आयुष्यातील पत्नी आहे खूपच सुंदर..

मित्रहो, मनातील दुःखाची कवाडे बंद करून क्षणिक काळ हसत हसत आयुष्य जगायला शिकवणारे हे टेलिव्हिजन चे माध्यम माणसाच्या आयुष्याचा महत्वाचा भाग बनले आहे. यामुळे मनाला थोडासा विरंगुळा मिळतो आणि मग विचार आणि थकलेले मन आपोआप ताजेतवाने होऊ लागते. प्रेक्षकांच्या बंधीस्थ मनाला या टेलिव्हिजन वरील अनेक कार्यक्रम मोकळीक देतात. यावर काही मालिका खूप सुंदर सहकुटुंबाला एकत्र हसवणारी ,रडवणारी असतात. त्यातील कलाकार देखील नेहमी व्यस्त असणाऱ्या माणसांच्या आयुष्याचा अविभाज्य घटक बनून पडद्यावर झळकतात. त्यांच्या विविधांगी साकारलेल्या भूमिका पाहून काही क्षण मन प्रसन्न होऊन जाते.

टेलिव्हिजन वरील काही लोकप्रिय मालिकांपैकी ” तारक मेहता .. ” ही मालिका देखील प्रचंड लोकप्रिय आहे. यातील अतरंगी पात्रे आणि त्या पात्रांनी साकारलेल्या गंमतीदार भूमिका पाहण्यासाठी देशभरातील हजारो लाखो लोक उत्सुक असतात. गेली बारा तेरा वर्ष ही मालिका आपले अस्तित्व टिकवून आहे. या मालिकेमुळे अनेक रडके चेहरे हसरे बनले आहेत, यातील कलाकारांचा अतुलनीय अभिनय मनाला अलगद स्पर्शून जातो. सर्व कलाकारांनी वेगवेगळ्या भूमिका घेतल्या आहेत, त्यांचे जात धर्म वेगळे असले तरीही ते कसे एकत्रितपणे साथ निभावतात याचे दृश्य दाखवले आहे. या मालिकेतील चंपकलाल गडा हे ज्येष्ठ नागरिक म्हणून अभिनय साकारतात, यामध्ये ते जेठालाल चे वडील बनले आहेत. पण मालिकेत ते जरी उतारवयातील, जुन्या विचारात रमणारे बापूजी असले तरी खऱ्या जीवनात मात्र ते तरुण आणि खूप रोमँटिक आहेत.

amit bhatt family with sons
amit bhatt family with sons

गोकुळ धाम सोसायटी मध्ये चंपकलाल चाचा म्हणून त्यांची सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे, या मालिकेतील त्यांचा अभिनय इतका सुंदर आहे की कौतुक करताना शब्दावर विरामहचिन्ह आणि नुसता टाळ्यांचा कडकडाट करावासा वाटतो. या मालिकेने वेळोवेळी प्रेक्षकांना खूप छान छान संदेश दिला आहे, समाजात वावरताना आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याची जाणीव ही मालिका नेहमी करून देत असते. या मध्ये गडा फॅमिली मधील चंपकलाल गडा यांच्या खाजगी आयुष्याबद्दल आज आपण तुरळक माहिती घेणार आहोत. चंपकलाल गडा उर्फ अमित भट्ट हे या मालिकेतून देशभर लोकप्रिय आहेत. ते खऱ्या आयुष्यात खूप शांत रोमँटिक आहेत, त्यांच्या पत्नीवर ते भरपूर प्रेम करतात. ते सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात, आपल्या पत्नीसोबत खूप छान छान फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असतात. अमित भट्ट आणि त्यांची सुंदर पत्नी कृती भट्ट यांचे सोशल मीडियावरील फोटो भरपूर लोक पसंत करतात.

amit bhatt with kriti bhatt
amit bhatt with kriti bhatt

आपण फोटोत पाहू शकतो की कृती भट्ट दिसायला किती सालस आणि सुंदर आहेत, त्या ” तारक मेहता ..” च्या सेट वर नेहमी येतात, तेथील कलाकारांसोबत त्यांची खुप चांगली ओळख आहे. खास करून तेथील महिला मंडळ सोबत त्यांची खूप छान मैत्री आहे. कृती आणि अमित यांची जोडी खूप छान दिसते, ते दोघे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. त्यांचे विनोदी व्हिडीओ नेहमी शेअर होतात. अमित यांच्या इंस्टा रील वर कृती यांचे खूपसे सुंदर विनोदी व्हिडीओ पाहायला मिळतात. यामध्ये कृती खूप क्युट आणि सुंदर दिसतात. अमित भट्ट आपली पत्नी कृती भट्ट यांच्यावर भरपूर प्रेम करतात, हल्ली सोशल मीडियावर त्यांनी एक नवी पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये अमित भट्ट यांनी ” तूच माझे सर्वस्व आहेस ” अशी कॅप्शन दिली आहे. या फोटो मध्ये त्यांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे.

amit with kriti bhatt
amit with kriti bhatt

अमित भट्ट हे अजून खूप तरुण दिसतात, त्यांचे वय दिलीप जोशी यांच्यापेक्षा देखील कमी आहे. पण त्यांची बापूजींची भूमिका त्यांना हुबेहूब जमते. त्यांना अशीच लोकप्रियता मिळत राहो ही सदिच्छा. मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर देखील नक्की करा.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.