Breaking News
Home / मराठी तडका / ए गरम बांगड्या, गरम बांगड्या.. एलिझाबेथ एकादशी मधील छोटी “झेंडू” आता दिसते खूपच सुंदर..
saili bhandarkavathekar elizabeth ekadashi movie
saili bhandarkavathekar elizabeth ekadashi movie

ए गरम बांगड्या, गरम बांगड्या.. एलिझाबेथ एकादशी मधील छोटी “झेंडू” आता दिसते खूपच सुंदर..

मित्रहो, चित्रपट सृष्टीत अनेक बालकलाकार आपल्या अभिनयाची भुरळ घालतात, त्यांच्यामुळे चित्रपट पाहण्यास खूप उत्साह वाढतो. बालकलाकारांना चित्रपटात संधी दिल्यामुळे त्यांच्या कोवळ्या मनावर कलेचे अलगद ठसे उमटले जातात आणि मग त्यांना भविष्याची दिशा मिळून जाते. असे भरपूर चित्रपट आहेत ज्यामध्ये काही बालकलाकारांनी इतका सुंदर अभिनय केला आहे की भरपूर वर्षे उलटूनही लोक पुन्हा पुन्हा चित्रपट पाहतात. अशी भरपूर उदाहरणे आहेत ज्यामध्ये बालकलाकारांच्या भूमिका अजरामर झाल्या आहेत. त्या भूमिकांची आजही खूप स्तुती केली जाते.

कोवळ्या मनाचे भाव निखळपणे मांडणारा चित्रपट ” एलिझाबेथ एकादशी ” , या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. यातील कथानक देखील खूपशा लोकांना आवडले. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असून यातील बालकलाकारांनी विशेष ओळख मिळवली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाचे बेस्ट इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड तसेच पुणे फिल्म डेस्टिवल २०१५ बक्षीस तसेच झी चित्र गौरव अवॉर्ड २०१५, अजिंक्य डी. वाय. पाटील Filmfare पुरस्कार सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या विभागातील ४ महत्वाच्या पुरस्कारांसाठीही विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते. चित्रपटात नंदिता धरी, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर, पुष्कर लोणारकर आणि दुर्गेश बडवे हे बालकलाकार मुख्य भूमिकेत झळकले होते. यातील श्रीरंग महाजनने ज्ञानेशची भूमिका साकारली असून सायलीने मुक्ताची भूमिका पार पाडली होती. यामध्ये तीला झेंडू सुद्धा म्हटले गेले आहे. तेव्हापासून सायली झेंडू नावाने खूप लोकप्रिय झाली.

elizabeth ekadashi film by Essel Vision Productions
elizabeth ekadashi film by Essel Vision Productions

आपली आवडती सायकल वाचवण्यासाठी हे बालकलाकार अगदी जीवाचा आटापिटा करतात याची कल्पना मांडली आहे, त्यांच्या प्रयत्नातून पुढे काय काय घडते ते खूप सुंदर आणि उत्कृष्टपणे दर्शवले आहे. यातील सर्व घटनांचे चित्रीकरण खूपच सुंदर रेखाटले आहे. श्रीरंगने ज्ञानेशची भूमिका अगदी सहजपणे निभावली आहे आणि सायलीने झेंडू बनून अनेकांचे मन जिंकले आहे. विशेष म्हणजे झेंडूचा ” ए गरम बांगड्या, गरम बांगड्या..” हा डायलॉग प्रचंड लोकप्रिय झाला त्यामुळे तीचा अभिनय आणि हसरा चेहरा सर्वांच्या मनावर कायमचा कोरला गेला. सायलीचा अभिनय उत्कृष्ट भाष्य करतोच, सायलीला अभिनयाहून नृत्य जास्त प्रिय आहे. तीने अगदी लहानपणापासून भरतनाट्यम शिकण्यास सुरुवात केली. तीला यामध्येच आपले करिअर घडवायचे आहे. ती खूप रेखीव नृत्य करते, अभिनयाला जोड असणारी तीची ही नृत्यकला नक्कीच तीचे भविष्य उजळ बनवणारी असेल.

actress sayali bhandarkavathekar
actress sayali bhandarkavathekar

पंढरपूर येथील कवठेकर प्रशालेत शिकत असताना सायली, पुष्कर आणि दुर्गेश यांना चित्रपटाच्या ऑडिशनसाठी निवडले गेले होते. ऑडिशन मध्ये या बालकलाकारांनी आपली कला खूप सहज आणि सुंदर सादर केली त्यामुळे त्यांना या चित्रपटासाठी लगेच निवडले. ज्ञानेशची भूमिका साकारणाऱ्या श्रीरंग महाजन याला आपण ओळखतोच, या आधी तो चिंटू २ मध्ये दिसला होता. श्रीरंग हा पुण्यात राहतो, त्याने तिथूनच आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. तर पुष्कर लोणारकर हा टी टी एम एम ( तुझं तू माझं मी ), रांजण, बाजी, चि.व.चि.सौ.का. या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय करताना आपणास पहायला मिळाला..

तीने आपल्या कलेतून खूप लोकप्रियता मिळवली, एवढ्या लहान वयात तीने अनेक मोठमोठ्या कलाकारांची मने जिंकली आहेत. सायलीच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपट सृष्टीतील सर्वजण तसेच रसिक प्रेक्षक तिच्या कलेकडे क्षणात आकर्षित झाले होते. आयुष्याच्या सुरुवातीला या बालकलाकारांना संधी मिळत आहे आणि या संधीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेऊन भरपूर लोकप्रियता मिळवली आहे. एवढ्या लहान वयात त्यांची ही कला पाहून अनेकजण थक्क होतात. अशीच त्यांची प्रगती होत राहो आणि पावलोपावली संधी मिळत राहो ही सदिच्छा. मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा तसेच जर आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा नक्की करा.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.