राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे लग्न सात महिन्यांपूर्वी झाले असा दावा राखीने सोशल मीडियावर केला होता. आदिल सोबत लग्नाचे काही व्हिडीओ आणि फोटो तिने पुराव्यानिशी मीडियाला दिले होते. आदिलने लग्न झाल्याचे नाकारल्यामुळे तिला हे उघड करावे लागले होते. मात्र आदिल दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडलाय आणि तो माझ्यापासून दूर जातोय याची कुणकुण राखीला मराठी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर लागली होती. त्यावर आदिलने काही काळाने हे लग्न मान्य केले होते. यादरम्यान राखीच्या आईचे निधन झाले. त्यावेळी राखी काही दिवसांसाठी गप्प झाली होती, मात्र आदिल आपल्याला फसवतोय हे ती जाणून होती.
आदिलचे दुसऱ्याच एका मुलीसोबत अफेअर आहे आणि तो तिच्यासोबत रात्र घालवतोय. आपले वैवाहिक आयुष्य अडचणीत आहे हे ती मिडियासमोर सतत सांगत होती. काल आदिल आपल्याला सोडून त्या मुलीकडे कायमचा निघून गेलाय असे राखी भावनिक होऊन म्हणाली. मिडीयाला यासंदर्भात राखीने अनेक पुरावे देखील दिले आहेत. दरम्यान राखीने आता आदिलच्या गर्लफ्रेंडचे नाव देखील जाहीर केले आहे. तनु चंदेल ही अभिनेत्री माझ्या नवऱ्याला माझ्यापासून हिरावून घेतीये असा दावा राखीने केला आहे. तनु चंदेल हे मॉडेलिंग क्षेत्रातील एक मोठं नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तनु मॉडेलिंग आणि जाहिरात क्षेत्रात नाव कमवत आहे. यासोबतच काही अल्बम साठी तिने काम केलेले आहे. बॉलिवूड चित्रपट तसेच छोट्या पडद्यावरील काही शो मध्ये ती झळकली आहे.
मात्र असे असले तरी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी ती माझ्यासोबत अशी वागतीये असे राखीने म्हटले आहे. तनु आणि आदिल गेल्या काही महिन्यांपासून एकमेकांना डेट करत आहेत. मी माझे वैवाहिक आयुष्य तिच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. मी तिच्याशी हे फोनवरून बोलले सुद्धा आहे. माझ्याकडे या संदर्भात सगळे पुरावे आहेत मात्र आदिल मला सोडून तिच्याकडे गेला आहे. आदिलने माझ्या प्रसिद्धीचा फायदा घेतला, मला फसवलं असे राखी त्याच्यावर आरोप लावताना म्हणाली. दरम्यान आदिलने अजूनही यावर मौन बाळगणे पसंत केले आहे. राखीकडे असणारे सगळे पुरावे पाहता राखी जे करतीये ते योग्य आहे असे अनेकांचे म्हणणे आहे. आदिल फसवा आहे त्याच्यापासून राखीने वेळीच सावध व्हावे असा सल्ला तिला दिला जात आहे.