Breaking News
Home / ठळक बातम्या / किरण माने यांनी पत्रकार परिषदेत केले खळबळजनक गौप्यस्फोट
actor kiran mane
actor kiran mane

किरण माने यांनी पत्रकार परिषदेत केले खळबळजनक गौप्यस्फोट

​किरण माने यांना राजकीय पोस्ट केल्यामुळे मालिकेतून काढून टाकण्यात आले होते. त्यानंतर मालिकेतील कलाकारांनी त्यांच्या गैर वागणुकीबाबत अनेक खुलासे केले होते. मी आणि माझ्याचमुळे मालिका चालली असा आव त्यांनी आणला होता असा दावा मालिकेच्या कलाकारांनी केला होता. त्यानंतरही किरण माने यांनी हार मानली नाही आणि सत्य काय आहे, याचा उलगडा मी पत्रकार परिषदेत करणार आहे असे म्हटले होते. त्याअनुषंगाने किरण माने यांनी नुकतीच एक पत्रकार परिषद भरवली होती.​ त्यात त्यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांचे खंडन केले आहे.

actor kiran mane
actor kiran mane

सुरुवातीला पत्रकार परिषदेत वकील असीम सरोदे यांनी किरण माने यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला.त्यानंतर किरण माने यांनी आपल्यावर झालेल्या आरोपांबाबत स्पष्टीकरण देत म्हटले की, मी राजकिय पोस्ट केली होती याचा बराचसा संबंध मला मालिकेतून काढून टाकण्यात आल्याशी जोडला जातो. मला कोणी काम देणार नाही असेही बोलले जात होते मला धमक्या दिल्या जात होत्या. ही धमकी का मी आता गप्प बसणार नाही. जातीयवादावर आजवर अनेकांनी भाष्य केले आहे. परंतु जात धर्म पंथ या पलीकडे जाऊन माणूसकीशी नाळ जोडलेले अनेक लोक आहेत. मला रस्त्यावरून जाताना मायेनं विचारणारी अ​​शी अनेक लोकं भेटली आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असे म्हणाली.​

kiran mane
kiran mane

राजकारणी लोकं तर शिव्यांचे धनी असतात पण मला तिथेही जाऊन धक्का बसला की कितीतरी राजकारणी लोक माझ्या मदतीसाठी उतरले, माणूसपणाचा धागा घेऊन. परंतु ही लोकं जास्त असली तरी त्यांचा आवाज दाबला जातो त्याउलट मूठभर लोक जातविरोधी मोठा आवाज करतात. मानवता वाद्यांचा आवाज कुठेतरी दाबला जातो त्यामुळे कदाचित मंत्र्यांचा आवाज देखील कुठेतरी दाबला जातोय. दहा मध्ये दोन सत्ताधारी असे आहेत जे विषारी वृत्तीचे आहेत, ज्यांनी त्यांचा आवाज दाबला असेल.​ मला फक्त एकच प्रश्न आहे की माझ्यावर लावण्यात आलेल्या आरोपांवर मला कुठली नोटीस का देण्यात आली नाही.

मी केलेला गुन्हा जर तुम्हाला गंभीर वाटत असेल, तर त्याच वेळी मला का नाही जाब विचारला. माझ्यावर आरोप करणाऱ्यांमध्ये महिला आहेत तर काही दिग्दर्शक आणि अभिनेता देखील आहे. मग तक्रार सांगताना केवळ महिलांबाबत गैरवर्तन असंच का म्हटलं आहे?​ केवळ मीडियाला भरकटवण्यासाठीच हे विधान केले गेले आहे. मला वाटत माझ्या विरोधात एक ठराविक गट निर्माण झाला आहे. कारण बाकीचे कलाकार मला मिस करतायेत असं आवर्जून सांगतायत. मग प्रॉडक्शन हाऊसमधील शादाब शेख नावाचा माणूस दुसऱ्याच्या बोलण्यावरून​ माझ्याविरुद्ध हे सर्व कारस्थान रचतोय असं किरण माने यांनी म्हटलं आहे.

About Varun Shukla

वरुण शुक्ला मॅनेजमेंट स्टुडन्ट असून न्यूज आणि एंटरटेनमेंट क्षेत्रात करिअर करू इच्छितो, सिनेमा सृष्टीतील नवनवीन घडामोडी वर तो लक्ष ठेवून असतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.