मराठी चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका आणि विविध नाटकांमधून प्रसिद्ध झालेला अभिनेता शशांक केतकर याची पत्नी प्रियांका केतकर हिने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. तिने सोशल मीडियावरून या नव्या व्यवसायाची बातमीप्रसारित केली आहे. अभिनेता शशांक केतकर अभिनयासोबतच “आईच्या गावात” या नावाचे पुण्यातील कोथरूड परिसरात हे एके काळचे प्रसिद्ध हॉटेल चालवत होता. हॉटेलची संपूर्ण जबाबदारी त्याची आई, वडील आणि पत्नी प्रियांका सांभाळत होती. शशांकने होणार सून मी ह्या घरची मालिके मधून लोकप्रियता मिळविली, त्यामुळे शशांकचे हॉटेल आहे प्रेक्षकांना समजताच खवय्ये मंडळी तुफान गर्दी करू लागले. मागील २-३ वर्षात झालेल्या घडामोडीमूळे काही अपरिहार्य कारणास्तव शशांकने हॉटेल बंद करण्याचा निर्णय घेतला. शशांक हॉटेल बंद करतोय असे म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांनी हॉटेल बंद करू नकोस अशा सकारात्मक प्रतिक्रिया देऊन त्याला आणि त्याच्या परिवाराला प्रोत्साहन दिले होते, मात्र यापुढे हे हॉटेल चालवणे त्याला शक्य नसल्याचे त्याने रसिक प्रेक्षकांचा मान ठेवत प्रतिक्रिया दिली होती.
प्रियांकाने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले असून, शशांक सोबत वर्ष २०१७ मध्ये विवाह झाला. काही महिन्यांपूर्वी शशांक आणि प्रियांकाला पुत्ररत्न प्राप्त झाले, शशांकने आपल्या मुलाचे नाव ऋग्वेद ठेवले असल्याचे जाहीर करून ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती. मुलाच्या जन्मानंतर साधारण सहा महिन्यांनी प्रियांकाने आता नव्याने स्वतःला व्यवसायात झोकून देण्याची तयारी दाखवली आहे. हॉटेल क्षेत्रातील मागील अनुभव पाहता नवीन व्यवसाय सुरु करताना चोखंदळ प्रेक्षकांना आवडेल असा निर्णय दोघांनी घेतला होता त्यानुसार दोन दिवसांपूर्वी नुकताच नवीन नावासह व्यवसाय सुरू करत असल्याचे तिने सोशल मीडियावरून कळवले होते. Rainbow Twinkles या नावाने प्रियंकाने आर्टस् अँड क्राफ्टस स्टोअर सुरू केले आहे. प्रियांकासह शशांकने ही आनंदाची बातमी नुकतीच चाहत्यांसोबत प्रसिद्ध केली असून आमच्या या नव्या व्यवसायाला तुमचे आशीर्वाद आणि शुभेच्छांची गरज असल्याचे म्हटले आहे. शशांक सध्या पाहिले न मी तुला या मालिकेत काम करीत आहे. ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेण्याच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. मालिकेचे शूटिंग देखील पूर्ण झाले असल्याने, एका नव्या मालिकेतून पुन्हा एकदा नव्या भूमिकेतून प्रेक्षकांना त्याच्या अभिनय प्रतीक्षा आहे.
सोपं नसतं काही ही ३१ ऑगस्टपासून प्लॅनेट मराठी ओटीटी ऍप वर वेब सिरीज सुरु होत आहे. शशांक स्मार्ट सुमीतच्या भूमिकेत तर अभिनेत्री मृण्मयी देशपांडे मुक्त विचारांच्या अनुजाच्या भूमिकेत आणि अभिनेता अभिजित खांडकेकर सेन्सिबल सिद्धार्थच्या भूमिकेत या वेब सिरीजच्या माध्यमातून आयुष्याने बांधलेली दुहेरी खूणगाठ सोडवणं कसे सोप्प आहे हे उलगडण्याचा प्रयत्न करतील. प्रेक्षकांसाठी या तिहेरी जुगलबंदीचा कलाविष्कार पाहण्याची सुवर्णसंधी ठरणार आहे. तूर्तास रेनबो ट्वीनकल्स या नव्याने सुरू झालेल्या शशांक आणि प्रियांकाला त्यांच्या व्यवसायास रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळो त्यांची भरभराटी होवो अशा शुभेच्छा देऊया..