Breaking News
Home / मराठी तडका / माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनया लवकरच करणार लग्न.. लग्नाच्या बस्त्याची नुकतीच झाली खरेदी
rasika sunil adi bilagi
rasika sunil adi bilagi

माझ्या नवऱ्याची बायको मालिकेतील शनया लवकरच करणार लग्न.. लग्नाच्या बस्त्याची नुकतीच झाली खरेदी

झी मराठी वाहिनीवर माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका प्रसारित केली जात होती. तब्बल ४ वर्षे या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. त्यामुळे मालिकेतील सर्वच पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. विशेष म्हणजे मालिकेतील शनया हे पात्र विरोधी भूमिका साकारत असले तरी तिने प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली होती. आता लवकरच शनया खऱ्या आयुष्यात लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे समोर आले आहे ही तिच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ठरत आहे.

rasika sunil shanaya wedding
rasika sunil shanaya wedding

मालिकेतील शनया हे पात्र अभिनेत्री रसिका सुनील हिने साकारले होते. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेअगोदर तिने गर्लफ्रेंड, पोश्टर गर्ल, गॅट मॅट, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. व्यावसायिक नाटक साकारत असताना रसिकाने 9 x टीव्ही वरील लक्स झकास हिरोईन कॉन्टेस्टमध्ये पार्टीसिपेट केले होते. तुम बिन मोहें…या व्हिडीओ अल्बममध्ये गायनासोबतच त्यात कामही केले होते. त्यामुळे रसिका उत्तम गायिका देखील आहे हे प्रेक्षकांच्यासमोर आले. अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या तिन्ही क्षेत्रात कार्यरत असलेली रसिका आता लवकरच लग्न करणार आहे. काही दिवसांपूर्वी यूएसए स्थित आदित्य बिलागी याने रसिकाला रोमँटिक डेटवर नेऊन प्रपोज केले होते. रसिकाने देखील त्याने केलेल्या प्रपोजला आपला होकार कळवळा होता.

shivshahi paithani rasika shopping
shivshahi paithani rasika shopping

मागील काही दिवसांपासून हे दोघे यूएसए ला एकत्रित राहत होते मात्र आता ते ठाण्यातील आपल्या घरी परतले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. रसिका आणि आदित्य यांच्या घरी आता त्यांच्या लग्नाची लगबग सुरू आहे. नुकतीच ठाणे येथील शिवशाही पैठणी या प्रसिद्ध दुकानाला रसिकाने भेट दिली आहे. इथेच तिने आपल्या लग्नाच्या बस्त्याची खरेदी देखील केलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे रसिका आणि आदित्य हे दोघेही लवकरच लग्न करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. लग्नाची तारीख अजून या दोघांनी जाहीर केली नसली तरी तिच्या या बातमीने तिचे चाहते भलतेच खुश झाले आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.