Breaking News
Home / मालिका / या मराठी अभिनेत्रीला झाली कन्यारत्न प्राप्ती…
dipashree and amey mali blessed with baby girl
dipashree and amey mali blessed with baby girl

या मराठी अभिनेत्रीला झाली कन्यारत्न प्राप्ती…

मराठी मालिका अभिनेत्री “दिपश्री माळी ” हिने काही दिवसांपूर्वी आपल्या डोहळजेवणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करून आई होणार असल्याचे कळवले होते. काल रविवारी दिपश्री माळी हिने मुलीला जन्म दिला असून ही आनंदाची बातमी सोशल मीडियावरून सांगितली आहे. “एक नवीन स्पर्श, नवीन साथ कायमची, एक विश्वास निरंतर राहणारा, एक प्रवास एकत्रित…नवीन विश्व …नवीन आयुष्य, आतून बाहेरून बदलून टाकणारं…आणि…शेवटपर्यंत हक्काने सतत कानावर ऐकू येणारा….निःशब्द करणारा एकच शब्द “आई”. काल आमच्या घरी लक्ष्मी आली…मुलगी झाली हो…Proud Mom…Yesterday Blessed with Baby Girl…” असे म्हणत दिपश्री माळी हिने आपल्या घरी चिमुकलीचे आगमन झाले असल्याचे सांगितले आहे. तिच्या या बातमीने मराठी सेलिब्रिटींनी दपश्रीला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

deepashree mali
deepashree mali

साधारण चार वर्षांपूर्वी दिपश्रीने अमेय माळीसोबत लग्न केले होते. आपला संसार सांभाळत मधल्या काळात तिने अभिनयाची आवड जोपासावी म्हणून मालिकांमध्ये काम केले होते. गर्ल्स हॉस्टेल ह्या मालिकेत तिने साकारलेली भूमिका सर्वानाच आवडली होती.
दिपश्री माळी ही मराठी चित्रपट आणि मालिका अभिनेत्री असून ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेत तिने अभिनय साकारला होता. ही मालिका झी युवा वाहिनीवर प्रसारित केली जात होती. अभिनेत्री सुरुची अडारकर आणि सुयश टिळक यांनी या मालिकेत प्रमुख भूमिका बजावली होती. एकत्रितपणे त्यांनी साकारलेली ही दुसरी मालिका ठरली होती. या मालिकेतून दिपश्री छोट्या पडद्यावर झळकली होती. याशिवाय झी युवावरील “गर्ल्स हॉस्टेल” ही आणखी एक मालिका तिने अभिनित केली आहे. दिपश्री सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह आहे. दरवेळी ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवनवीन पोस्ट, आपल्या आठवणी शेअर करत असते. दपश्रीला तिच्या आयुष्याच्या या गोड प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन…

dipashri mali and amey mali
dipashri mali and amey mali

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.