आई कुठे काय करते या मालिकेत नुकतीच शेखरची पुन्हा एकदा एन्ट्री करण्यात आली आहे. शेखरच्या एंट्रीने अनिरुद्ध आणि संजनाला मात्र पुरता त्रास झालेला पाहायला मिळत आहे. शेखर हे पात्र तितकेच उठावदार असल्याने त्याच्या आगमनाची चाहूल लागताच प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. शेखरचा डॅशिंग अंदाज आणि बिनधास्तपणा मालिकेच्या यशाला आणि पर्यायाने अनिरुद्धला प्रसिद्धी मिळवून देणारा ठरला आहे. शेखरच्या व्यक्तिरेखेने माझी भूमिका अधिक उठावदार झाली असे अभिनेते मिलिंद गवळी यांचे म्हणणे आहे. मिलिंद मयूरबद्दल बोलताना म्हणतात की, मयूर खांडगे याच्या येण्याने चैतन्य येतं. सेटवर तो आला की वातावरणच बदलतं.
त्याला चिडवायला, त्रास द्यायला, छळायला सगळ्यांनाच आवडतं. नेहमी हसतमुख आणि सतत काहीतरी घडत असतं. तो आजूबाजूला असला की सीन विषयी चर्चा असते. सीनमध्ये त्याला अजून काय काय करता येईल याचा सतत मनन चिंतन चालू असतं. बरं त्याचे सीन काही साधे सरळ सोपे नसतात शेखरचे. तो आला म्हणजे तो भडाभडा भडाभडा बोलणार, खूप बोलणार. बरं मुग्धा त्याची वाक्य पण अफलातून गमतीशीर मजा आणणारी लिहिते. आणि तो ती वाक्य खूप छान पद्धतीने घेतो पण त्याच्याबरोबर शूटिंग करत असताना मजाच येते. आई कुठे काय करते या सिरीयल मध्ये मयूर खांडगे हा एकमेव असा कलाकार आहे, ज्यांनी मुग्धाची वाक्य अनेक वेळा बदलली आहेत.
बरं त्याने काही काही शब्द त्याच्या मनाची जी काय घेतलीये किंवा टाकली आहेत ते शब्द नंतर मुग्धाने वापरायला सुरुवात केली. त्यातलाच एक भन्नाट शब्द माझ्यासाठी म्हणजेच अनिरुद्ध साठी त्यांनी पहिल्याच सीनमध्ये वापरला. तो म्हणजे अन्या देशमुख, अनिरुद्धला अन्या म्हणाला त्यानंतर अनिरुद्ध आणखीनच फेमस झाला. एका कलाकारासाठी कलाकाराने दिलेली ही दाद नक्कीच कौतुकास पात्र आहे. म्हणूनच मिलिंद गवळी आपल्या सहकलाकारांचे नेहमीच कौतुक करताना दिसतात. मालिकेत अप्पा घर सोडून गेले याचा अनिरुद्धला त्रास होत आहे.
मला खूप वाईट वाटतंय हे तो आईजवळ बोलताना पाहायला मिळाला. मी खूप तिरसट स्वभावाचा आहे, मी तुझ्यापेक्षा अप्पांसारखा झालो असतो तर खूप चांगलं झालं असतं याची उपरती आता अनिरुद्धला झाली आहे. मालिकेत लवकरच अरुंधती आणि आशुतोषचे लग्न व्हावे ही अप्पांची ईच्छा आहे. मात्र अरुंधती त्यांच्या या निर्णयाचा स्वीकार करणार की नाही हे येत्या काही दिवसातच उलगडेल. तूर्तास शेखरच्या भूमिकेसाठी अभिनेता मयूर खांडगे यांना खूप खूप शुभेच्छा.