Breaking News
Home / मराठी तडका / आगरी किंग विनायक माळी आणि लव्हेबल रितिका श्रोत्री यांच्या धम्माल मॅडनेसची रोलर कोस्टर राइड 
vinayak mali and ritika shrotri
vinayak mali and ritika shrotri

आगरी किंग विनायक माळी आणि लव्हेबल रितिका श्रोत्री यांच्या धम्माल मॅडनेसची रोलर कोस्टर राइड 

आगरी कॉमेडी किंग दादूस म्हणजेच युट्युबवर विनोदी व्हिडीओद्वारे स्वतःची ओळख निर्माण करणारा अवलिया विनायक माळी. आगरी मराठी भाषेत असणारे विनायकचे दिलखुलास कॉमेडी व्हिडीओ प्रेक्षकांना प्रचंड आवडतात आणि तेवढेच जास्त सर्रास शेअर केले जातात. आता आपला हा दादूस मराठी चित्रपट सृष्टीत प्रदार्पण करीत आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने हटके आणि फ्रेश जोडी प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री रोमँटिक सफर ‘मॅड’ या चित्रपटातून रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

vinayak mali and ritika shrotri
vinayak mali and ritika shrotri

मनमुराद जगण्यासाठी एक कमालीचे वेडेपण असावे लागते, असा हा मॅडनेस तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकतो किंवा एखाद्या संकटात देखील टाकू शकतो, वेडेपणाचा हा तुफानी नशा घेऊन आले आहेत प्रसिद्ध लेखक समीर आशा पाटील आणि चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळी आहे दिग्दर्शक निखिल खजिनदार यांनी. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून, या पोस्टरमधून कलाकारांनी साकारलेल्या विनोदी मॅडनेसची कल्पना येते. समीर आशा पाटील आणि मोशन पिक्चर्स यांची निर्मिती असणार आहे, या अगोदर या टीमने बहुचर्चित डार्लिंग चित्रपट बनविला होता. डार्लिंग चित्रपटात प्रथमेश परब, रितिका श्रोत्री सोबत निकिल चव्हाण यांची अनोखी लव्ह स्टोरी पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली होती.

aagri king vinayak and romantic ritika
aagri king vinayak and romantic ritika

प्रथमेश परब आणि रितिका या दोघांनी टकाटक या चित्रपटात अभिजीत मकर व प्रणाली भालेराव यांच्या सोबत उत्तम ऑनस्क्रीन केमिस्ट्री दाखविली होती. आता निर्मात्यांनी नवीन चेहऱ्यांना संधी देत रोमॅंटिक कॉमेडी मॅड चित्रपट या वर्ष अखेर प्रदर्शित होईल अशी आशा आहे. युट्युबच्या दुनियेतून थेट रुपेरी पडद्यावर विनायकला मिळालेली ही सुवर्ण संधी उज्वल भविष्याचे पहिले पाऊल ठरणार आहे. विनायक माळीचा अतरंगी विनोदी अंदाज तर ठसकेबाज लव्हेबल रितिका श्रोत्री यांची रोमँटिक कॉमेडी चित्रपटाची रंगत कशी वाढवतील याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये आहे.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.