Breaking News
Home / मालिका / मालिकेने निरोप घेताच या अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री
vikas patil big boss entry
vikas patil big boss entry

मालिकेने निरोप घेताच या अभिनेत्याची बिग बॉसच्या घरात एन्ट्री

मराठी बिग बॉसच्या ३ ऱ्या सिजनची आतुरता अधिक ताणून न धरता आज ती प्रेक्षकांच्या समोर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मालिकेत सहभागी होत असलेल्या अनेक कलाकारांची नावे आता उघड होताना दिसत आहे. या शोमध्ये सहभागी होत असलेल्या अभिनेत्याचे नाव आहे विकास पाटील. विकास पाटील हा बायको अशी हव्वी या मालिकेत विभासची प्रमुख भूमिका साकारताना दिसत होता. त्याच्यासोबत अभिनेत्री गौरी देशपांडे हिने मुख्य भूमिका बजावली होती. या मालिकेने कालच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. बिग बॉसच्या ३ ऱ्या सिजनचे आगमन म्हणून ही मालिका आटोपती घेण्यावर अधिक भर देण्यात आला होता.

vikas patil big boss entry
vikas patil big boss entry

मालिकेत विभास आणि जान्हवी शेवटच्या क्षणी एकत्र सुखाने नांदताना दर्शवले. अर्थात मालिकेचा शेवट गोड होणार हे निश्चित असतेच त्यामुळे विभास विरोधी भूमिका दर्शवत असल्याने त्याचा शेवट मात्र गोडच झालेला पाहायला मिळाला. बायको अशी हव्वी मालिका एक्झिट घेते न घेते तोच विकास पाटील आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री करताना दिसत आहे. विकासच्या एंट्रीने बिग बॉसचा शो अधिकच खुलणार हे वेगळे सांगायला नको. मालिकेची एक्झिट देखील बिग बॉसच्या शोमुळेच करण्यात आली हे आता स्पष्ट झाले आहे. विकास पाटील ने बहुतेक चित्रपटातून नायकाच्या भूमिका बजावल्या होत्या. वर्तुळ, गडबड झाली, शेंटिमेंटल,गोळा बेरीज, तुकाराम अशा चित्रपटातून आणि मालिकेतून त्याला महत्वाच्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. स्वाती पाटील हे विकास पाटीलच्या पत्नीचे नाव आहे.

actor vikas patil
actor vikas patil

गेल्या वर्षी ६ डिसेंबर रोजी विकासने त्याची पत्नी स्वतीसोबतचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून ‘कारभरीन बाई’ असे कॅप्शन देऊन लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. बिग बॉसच्या सिजन ३ मध्ये विकास पाटील सोबत तृप्ती देसाई, विशाल निकम, संतोष चौधरी( दादुस), अक्षय वाघमारे, मीनल शाह, जय दुधाने, शिवलीला बाळासाहेब पाटील, गायत्री दातार, सुरेखा कुडची, अविष्कार दारव्हेकर, मीरा जगन्नाथ, उत्कर्ष शिंदे, स्नेहा वाघ, सोनाली पाटील हे १५ स्पर्धक एन्ट्री घेत आहेत तुर्तास विकास पाटील आणि त्याच्यासोबत सहभागी होत असलेल्या इतर स्पर्धकांना बिग बॉसच्या सिजन ३ साठी खूप खूप शुभेच्छा.

vikas patil with wife swati patil
vikas patil with wife swati patil

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.