स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेत अखेरीस अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू झालेली आहे. हे लग्न हाऊ नये म्हणून अनिरुद्ध वेगवेगळे अडथळे निर्माण करत आहे. नुकतेच त्याने अरुंधती लग्नात घालणार असलेले मंगळसूत्र तोडून टाकले. असे करून आमचे लग्न मोडणार नाही असा ठाम विश्वास अरुंधती दाखवते. त्यामुळे आता काहीही केलं तरी हे लग्न होणार हे सत्य अनिरुद्धला पचवायला थोडे जड जाणार आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती वेगळे झाले, त्याने संजना सोबत दुसरा संसार थाटला. तिन्ही मुलांना आई वडिलांना अरुंधतीच्या विरुद्ध वागायला सांगितले, मात्र तरीही अरुंधती डगमगली नाही.
सगळं शांतपणे सहन करत तिने अनिरुद्धने निर्माण केलेल्या अडथळ्यांवर यशस्वीपणे मात दिली. आता बऱ्याच प्रयत्नानंतर अरुंधती आणि आशुतोषचे लग्न होणार असल्याने मालिकेचे प्रेक्षक खुश झाले आहे. लग्नसोहळ्याच्या ट्विस्टमुळे मालिकेचा ह्या आठवड्यातील टीआरपी वाढणार हे निश्चित आहे. अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नसोहळ्याचे शूटिंग आज पार पडले आहे. यावेळी मधुराणीने नारंगी गुलाबी रंगाची सुरेख पैठणी नेसलेली आहे. नवरीच्या गेटअप मधला मधुराणीचा लूक अतिशय खुलून दिसत आहे. ह्या आठवड्यात मालिकेत लग्नाची खरेदी पाहायला मिळाली होती. त्यामुळे या दोघांचे लग्न पाहण्यासाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दर्शवली. आज अखेरीस अरुंधती आपल्यावर प्रेम करणाऱ्या व्यक्तीशीच लग्न करत आहे. इतके दिवस सोशिक म्हणून जगणारी अरुंधती आता आपले निर्णय ठामपणे मांडायला लागली आहे.
याच अनुषंगाने अरुंधतीने महिलांना एक छान सल्ला देखील दिला आहे. झोकून देऊन प्रेम करणं वेगळं आणि प्रेमात स्वतःला हरवणं वेगळं. अरुंधतीने इतकी वर्षे अनिरुद्धच्या प्रेमात स्वतःला हरवून गप्प बसली आणि सगळ्यात कठीण तिला गेलं स्वतःला शोधणं की मी कोण आहे? मी किती सहन केलं, माझं काय अस्तित्व आहे. मला काय आवडतं, मी किती सहनशील आहे. मला काय टोलरेट करायला हवं, काय नाही हे मला सगळ्यांना सांगायचंय की, मैत्रिणींनो जाग्या व्हा! आणि जरा डोळे उघडून बघा. नाही म्हणायला शिका, जे आवडत नाही ती मतं ठामपणे मांडा. नाहीतर मग आहे त्यात आनंद माना. अरुंधतीच्या सल्ल्यानंतर अनिरुद्ध मात्र गप्प बसतो, मी इथे काहीच बोलत नाही. कारण मी जेवढं काही बोलतो ते हा अनिरुद्ध म्हणून बोलतोय असं होतं.