राखी सावंत आणि आदिल दुराणी यांचे प्रकरण गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. आदिल आपल्याला मारहाण करतो, त्याचे तनु चंदेल सोबत अफेअर आहे आणि आपल्याला धमक्या देतोय असे आरोप राखीने आदिलवर लावले होते. राखी सतत मिडियासमोर येत असल्याचे पाहून अटक होण्यापूर्वी तो राखी सोबत बोलायला गेला होता. मात्र यावेळी आदिलने राखीला मारहाण करत तिला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या सर्व गोष्टींमुळे राखीला अस्वस्थता जाणवू लागली काल रात्री ओशिवरा पोलीस चौकीबाहेर मिडिया समोर बोलत असताना राखीला चक्कर आली होती.
राखीने आदिल विरोधात मारहाण आणि धमकी दिल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानंतर दुपारी पोलिसांनी आदिलला ताब्यात घेतले होते. आदिलला आज अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले. सर्व मुद्दे आणि पुरावे लक्षात घेऊन आदिलला सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र आदिलला पोलीस कोठडी द्यायला हवी होती अशी मागणी रखीची वकील करत आहे. आदिलकडे राखीचे काही सिक्रेट व्हिडीओज आहेत. या व्हिडीओमुळे तो राखीला ब्लॅकमेल करत आहे. तिच्याकडून पैसे उकळत असल्याने त्याला पोलिसांची कोठडी मिळायला हवी होती असा खेद वकिलांनी व्यक्त केला आहे. यामुळे आदिलबाबतची सखोल चौकशी पोलिसांना करता आली असती, मात्र न्यायालयीन कोठडीमुळे बऱ्याच गोष्टींचा खुलासा होण्यास अडथळे आले आहेत.
दरम्यान आदिलने आपल्यावर हात उचलून मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे राखीने मिडियासमोर म्हटले आहे. माझ्या विरोधात जर गेलीस तर ट्रकवाल्याला ५० हजार देऊन तुला चिरडायला सांगतो अशी धमकी त्याने राखीला दिली आहे. राखीने आदिल विरोधात अनेक पुरावे दाखल केले आहेत. आदिलने बिजनेस सुरू करण्यासाठी राखीकडून काही करोड रुपये घेतले होते. आदिल पैसे परत करत नसल्याचे राखीचे म्हणणे आहे. याशिवाय मारहाण करणे, धमक्या देणे अशा कृत्यामुळे राखीने कायद्याचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आदिलच्या वकिलांनी राखीने लावलेले सर्व आरोप धुडकावून लावले आहेत. आदिलला केवळ ताब्यात घेतलं आहे, तो आरोपी नाही हे अजूनही सिद्ध व्हायचं आहे.
राखी आणि आदिल यांच्या बीजनेसचे अकाउंट दोघेही हँडल करत होते. त्यामुळे राखीची फसवणूक होण्याचे काहीच कारण नाही. उलट या दोघांमध्ये जो व्यवहार होईल त्यासंदर्भात त्यांना ६ अंकी ओटीपी दिला जायचा. ओटीपीचे तीन तीन अंक दोघांनाही मिळत होते त्यामुळे फसवणूक होते हा तिचा दावा चुकीचा आहे. आदिल आणि त्याचे कुटुंबीय या प्रकरणाला पूर्णपणे सहकार्य करत आहेत. तो आरोपी नाही असा दावा त्याच्या वकिलांनी केला आहे. आदिलने राखीला मारहाण केली नसल्याचेही वकिलांचे म्हणणे आहे. यावरून आता खरं कोण आणि खोटं कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.