बहुचर्चित मराठी बिग बॉसचा शो अवघ्या काही दिवसातच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे त्यामुळे या नव्या सिजनची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठी बिग बॉसच्या शोमध्ये यावेळी आयोजकांनी मोठे बदल घडवून आणलेले पाहायला मिळणार आहेत. या शोमध्ये १५ स्पर्धक सहभागी होत असतात त्यात नव्याने वाईल्डकार्ड एन्ट्री देखील करण्यात येते. मात्र यावेळी १६ स्पर्धक सहभागी होणार असल्याचे सांगितले जाते. महिला सदस्य आणि पुरुष सदस्यांची विषम संख्या येउ नये म्हणून हा बदल करण्यात येत आहे. हिंदी बिग बॉसचा सोळावा सिजन देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हे दोन्ही रिऍलिटी शो जवळपास काही तासाच्या अंतराने प्रसारित केले जाणार आहेत.
त्यामुळे कोणत्या शोला अधिक टीआरपी मिळणार याची उत्कंठा वाढली आहे. कारण बिग बॉसचा तिसरा सिजन हिंदी बिग बॉसच्या १५ व्या सिजनला तगडी टक्कर देताना दिसला होता. त्यात भर म्हणजे बॉलिवूड कलाकारांना बॉयकॉट केले जात आहे. त्यामुळे हिंदी रिऍलिटी शो सध्या मराठी बिग बॉसच्या तुलनेत प्रेक्षकांकडून डावलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठी बिग बॉसच्या ३ ऱ्या सिजनमध्ये वीकेंडला महेश सरांची शाळा भरवली जात होती. आठवड्याभरात स्पर्धकांनी केलेल्या कार्यावर, त्यांच्याकडून झालेल्या चुकांवर महेश मांजरेकर खडेबोल सूनवायचे. सिजन ४ मध्ये मात्र प्रेक्षक महेश सरांची ही शाळा मिस करणार आहेत. त्यामुळे कुठल्याही स्पर्धकावर आता महेश सरांचे नियंत्रण नसणार आहे.
हिंदी बिग बॉसच्या १६ व्या सिजमध्येही स्पर्धकांना रुल्स फॉलो करावे लागणार नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे घरात काय गोंधळ होणार आहे याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहेत. परंतु महेश सरांनी स्पर्धकांची शाळाच घेतली नाही तर मात्र प्रेक्षकांचा हिरमोड नक्कीच होणार आहे. त्यामुळे आयोजकांच्या या निर्णयावर प्रेक्षकांनी पूर्णपणे नाराजी दर्शवली आहे. महेश सरांची शाळा ही वीकेंडला प्रेक्षकांसाठी खरी मेजवानी ठरत असते. एखादा सदस्य चुकीचा वागला असेल तेव्हा त्याला आपली चूक समजण्यासाठी महेश सरांची ही शाळा महत्वाची भूमिका बजावत होती. आता ही शाळाच नसल्याने स्पर्धकांवर वचप बसणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे अनेकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अर्थात हा बदल घडून आल्यामुळे ४ थ्या सिजनमध्ये सर्वकाही ‘ऑल इज वेल’ असणार आहे.