आई कुठे काय करते या मालिकेत अरुंधतीने संजनाला नोकरीवरून काढून टाकले आहे त्यामुळे मालिकेला रंजक वळण मिळाले आहे. अरुंधतीने आपल्याला कामावरून काढून टाकले म्हणून संजना अरुंधतीच्या कार्यक्रमातच आपला संताप व्यक्त करते. आशुतोष केळकरच्या जीवावर तू हे बोलतेस म्हणून संजना अरुंधतीला हिनवते. मात्र संजना अगोदर कणखर स्त्री होतीस तू आता अशी का वागते आहे. याचा विचार करायला हवा असे अरुंधती तिला जाणीव करून देते. त्यावर संजना अरुंधतीला म्हणते की माझी लायकी असतानाही प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी मला संघर्ष करावा लागला आहे. पण तुझी लायकी नसतानाही तुला हे सहज मिळत असल्याने मला तुझा राग येतो.
तू फक्त आशुतोष केळकर मुळे इथं पोहोचली आहेस तो तुझ्यावर प्रेम करतो त्याचा तू फायदा घेतेस. असे संजना म्हणताच आशुतोष आणि नितीन संजनावर चिडतात आणि तिला हाकलून लावतात. अनिरुद्ध आणि संजना कार्यक्रमातून बाहेर पडल्यानंतर सर्वजण अरुंधतीच्या उत्तरावर खुश होतात आणि तू खूप छान बोललीस असे म्हणून तिला पाठिंबा देतात. अरुंधतीच्या याच निर्णयामुळे मालिकेच्या प्रेक्षकांनी देखील तिचे कौतुक केले आहे. इकडे आप्पा अरुंधतीच्या कार्यक्रमात गेल्यानंतर कांचनला गुडघ्याचा त्रास जाणवू लागतो. कांचनच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी अरुंधती तिथे येते मात्र तिलाच कांचनची बोलणी खावी लागत असतात. माझी कोणीच काळजी घेत नाही असे म्हणत कांचन अप्पांवर चिडतात.
तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी काहीच केलं नाही, आज दारात गाडी उभी आहे ती अनिरुद्धमुळे. माझ्यासाठी जे काही केलं ते माझ्या मुलांनी केलं आहे. कांचनच्या या बोलण्याचा आप्पांना राग येतो आणि कांचनला बोलू लागतात. कांचनच्या बोलण्याचा राग आल्यामुळे ते घर सोडून अरुंधतीसोबत निघून जातात. संजनाला नोकरीवरून काढून टाकल्याचे यश सांगतो त्यावेळी कांचन मात्र डोक्यावर हात मारुन घेते. लाडक्या लेकाची बायको म्हणून त्या नेहमीच संजनाशी चांगलं वागल्या आहेत. राहतं घर संजनाच्या नावावर असल्याने ती कांचनला घरातून कधीही बाहेर काढू शकते असा विचार प्रेक्षक करत आहेत. त्यानंतर कांचनला चांगलीच अद्दल घडेल अशी चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे. अर्थात हे क्षण मालिकेतून लवकरात लवकर पाहायला मिळोत अशी अपेक्षा प्रेक्षकांनी व्यक्त केली आहे.