Breaking News
Home / मालिका / तू तिला फोन कर, तिच्याशी बोल.. असं म्हणताच विशालने आईला तिच्याबद्दल सांगण्यास अडवलं
vishhal nikam mother at big boss house
vishhal nikam mother at big boss house

तू तिला फोन कर, तिच्याशी बोल.. असं म्हणताच विशालने आईला तिच्याबद्दल सांगण्यास अडवलं

बिग बॉसच्या घरात गेल्या दोन दिवसांपासून सदस्यांना भेटायला त्यांच्या घरच्यांनी हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे. सुरुवातीला विकासच्या पत्नीने बिग बॉसच्या घरात एन्ट्री करून विकास आणि इतर सदस्यांची भेट घेतली. मिराचा भाऊ, सोनालीची आई यांनी देखील पहिल्या दिवशी हजेरी लावली होती. त्यानंतरच्या भागात जयची आई बिग बॉसच्या घरात दाखल झालेल्या पाहायला मिळाल्या होत्या. उत्कर्षच्या पत्नीने आणि त्याच्या मुलाने देखील उत्कर्षची आणि घरातील सदस्यांची भेट घेतली.

big boss marathi saundarya vishal nikam
big boss marathi saundarya vishal nikam

आज विशालची आई आणि बहीण घरात दाखल झाले त्यावेळी विशाल खूपच भावुक झाला. ७२ दिवसांनी आईला भेटल्यामुळे विशालच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यावेळी आईने ‘असं रडत जाऊ नकोस’ असे विशालला म्हटले आणि कोणावर जास्त चिडू नकोस, एकटाच बसत जाऊ नकोस असेही सुचवले. तू खूप स्ट्रॉंग आहेस आणि खूप चांगला खेळ असा सल्ला त्यांनी विशालला दिलेला पाहायला मिळाला. विशाल त्याच्या वडिलांना देखील खूपच मिस करत होता त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे आणि ह्या क्षणी ते मला भेटायला यायला हवे होते असे तो आईला म्हणाला. वडिलांच्या आठवणीत त्याने आईला आणखी एकाला फोन कर असे म्हटले. तू तिला फोन कर, तिच्याशी बोल असं विशाल म्हणताच त्याच्या आईने ‘सौंदर्याचे’ नाव घेतले. मात्र तिच्याबाबत अधिक खुलासा करण्यास त्याने आईला थांबवले. ‘तिच्याबद्दल सांगायला अजून वेळ आहे’ असं विशाल नेमकं कोणाबद्दल बोलला हे गुपित त्याने बिग बॉसच्या घरात राखलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे सौंदर्या ही विशालची गर्लफ्रेंड असावी असा अंदाज त्याच्या चाहत्यांकडून बांधला जात आहे.

vishhal nikam mother at big boss house
vishhal nikam mother at big boss house

दरम्यान गायत्रीच्या कुटुंबातील व्यक्तींनी देखील गायत्रीची भेट घेतली त्यात विशेष म्हणजे एक चिमुकला पाहुणा घरातील इतर सदस्यांचे तसेच प्रेक्षकांचे देखील लक्ष्य वेधून घेताना दिसला. त्यानंतर मिनलच्या आईने आणि तिच्या भावाने बिग बॉसच्या घरात हजेरी लावली. गेले दोन दिवस बिग बॉसच्या घरात भावनांचा सुगंध दरवळत होता मात्र त्यानंतर आता नव्या कॅप्टन पदाच्या दावेदारासाठी घरात पुन्हा वाद होताना दिसणार आहेत. चल धर पकड हा नवा टास्क खेळताना  गायत्री आणि जय तसेच गायत्री आणि मीरा यांच्यामध्ये तुफान वाद झालेले दिसत आहेत. एवढेच नाही तर ह्या दोघी एकमेकांना हाडsss हाडsss म्हणून आपला राग व्यक्त करताना पाहायला मिळणार आहेत.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.