Breaking News
Home / मालिका / प्रेक्षकांची पसंती एकाला आणि पुरस्कार दिला दुसऱ्याला.. पुरस्कार सोहळ्याबाबत नाराजी
prarthana behere sankarshan karhade
prarthana behere sankarshan karhade

प्रेक्षकांची पसंती एकाला आणि पुरस्कार दिला दुसऱ्याला.. पुरस्कार सोहळ्याबाबत नाराजी

काल शनिवारी ३० ऑक्टोबर रोजी झी मराठी वाहिनीवर पुरस्कार सोहळा पार पडला. या सोहळ्याला कतरिना कैफ, रोहित शेट्टी तसेच गोविंदा सारख्या बॉलिवूड कलाकारांनी हजेरी लावली. त्यामुळे ह्या सोहळ्याची रंगत आणखीनच वाढलेली पाहायला मिळाली. झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या मालिकेच्या कलाकारांची मांदिआळी या सोहळ्याला चांगलीच सजली होती. पण ह्या पुरस्काराने काही प्रेक्षक मात्र पुरते नाराज झालेले पाहायला मिळत आहेत. कारण काहीच दिवसांपूर्वी सुरू झालेल्या मालिकांना पुरस्कार का दिला नाही अशी चर्चा सध्या प्रेक्षक सोशल मीडियावर करताना दिसत आहेत.

prarthana behere sankarshan karhade
prarthana behere sankarshan karhade

उत्कृष्ट भावंड म्हणून स्वीटू आणि चिन्याला पुरस्कार मिळाला तिथेच उत्कृष्ट मैत्री म्हणून यश आणि समीरला पुरस्कार मिळाला. प्रार्थना बेहरे, संकर्षण कऱ्हाडे यांनी या पुरस्कार सोहळ्यात तीन पुरस्कार मिळवले याबद्दल त्यांचे कौतुक अनेकांनी केले. मात्र ह्यावेळच्या पुरस्कार सोहळ्यात भावी सून, भावी सासू, भावी सासरे हे पुरस्कार येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेला अनुसरूनच देण्यात आला असल्याचा आरोप होत आहे. कारण आजवरच्या पुरस्कार सोहळ्यात अशी नामांकन पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. विशेष बाब म्हणजे स्वीटू ही कोणाची सून आहे मग भावी सासू आणि सासरे हा पुरस्कार नेमका कोणाला द्यायला हवा होता याबाबत अनेकांनी नाराजी दर्शवली आहे. स्वीटूच्या ऐवजी भावी सून हा पुरस्कार आदीतीला का नाही दिला असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. उत्कृष्ट सासू सिध्दुच्या आईला न देता ओमच्या आईला का दिला? त्या नेमक्या कोणाच्या सासू आहेत?…कारण स्वीटू तर मोहितसोबत लग्न करते मग शकू ही उत्कृष्ट सासू कशी असू शकते?..

awards govinda and katrina guest appearance
awards govinda and katrina guest appearance

इथे उत्कृष्ट सासरे म्हणून सिद्धूचे वडील देखील होते मग हा पुरस्कार दादा साळवींना का दिला. स्वीटूच लग्न जर मोहित सीबत झालं तर सासू आणि सुनेचा पुरस्कार स्वीटू आणि शकूला का दिला?.. या पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट वडिलांचा पुरस्कार देशपांडे सरांना देण्यात आला तर  सर्वोत्कृष्ट आईचा पुरस्कार नेहाला देण्यात आला याबाबत तक्रार नसली तरी वरील सर्व पुरस्कार योग्य व्यक्तीला दिले नसल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. ज्या कलाकारांना प्रेक्षकांनी पसंती दर्शवली होती त्या कलाकारांना मात्र योग्य पुरस्कार देण्यापासून डावलण्यात आले असेच आता म्हटले जात आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील कलाकारांना देखील योग्य तो पुरस्कार द्यायला हवा होता असं मत अनेकांनी व्यक्त केलं आहे. शिवाय भावी सून,  भावी सासू हे पुरस्कार कसे दिले याबाबत देखील प्रशचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

About Sanket Patil

संकेत पाटील हा सातारा लोकल न्यूज साप्ताहितकाचे लेखक आहे. तो आता पूर्णवेळ लेखक आहे आणि ट्विटरवर @sanket.y.patil या नावाने आपणास त्याचाशी हितगुज करता येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.