मराठी बिग बॉसच्या घरात आठवड्याला वेगवेगळे टास्क देण्यात येतात. हे टास्क पूर्ण करत असताना स्पर्धकांमध्ये बाचाबाची, हाणामारी झालेली नेहमीच पाहायला मिळते यावर प्रेक्षकांनी देखील नेहमीप्रमाणे नाराजी दर्शवली आहे. नुकत्याच झालेल्या एका टास्कमध्ये विशाल आणि विकास धावत येऊन उत्कर्षला मागे खेचण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी विकास उत्कर्षच्या गळ्याला धरून मागे खेचतो या प्रयत्नात उत्कर्षच्या डोक्याला मार लागतो. यावरून उत्कर्ष शिंदे च्या घरच्यांनी नाराजी दर्शवली आहे.तर उत्कर्षला मुका मार लागला असल्याचेही त्याच्या निदर्शनास आले आहे.
नुकतेच उत्कर्षला पाठिंबा दर्शवत आदर्श शिंदे ने स्पर्धकांवर नाराजी दर्शवणारी पोस्ट लिहिली आहे त्यात तो म्हणतो.. “हा कसला खेळ? काही Strategy आहे की नाही? मान्य आहे त्यांनी विकासला बाहेरच नाही येऊ दिलं पण ती strategy होती त्याच्यावर नक्किच शनिवारी निकाल लागला असता की ती strategy योग्य होती की नव्हती ..एवढ होऊनही Utkarsh Anand Shinde मधे sportsmanship असल्यामुळे तो शांत आहे आणि पुढे चाल्लाय. विकास ने मागून गळा धरुन आणि विशाल ने आंगला धरुन खाली पाडणे योग्य आहे? त्याच्या डोक्याला मुक्का मार ही बसला. Garden area असल्यामुळे त्या माराचा impact कमी झाला. पण तरीही तो बरा आहे असं आम्हाला कळविण्यात आले. BB ची team नेहमी स्पर्धकांच्या safety साठी सज्ज असते याची खात्री ही पटली. एवढं होऊन ही माझा भाऊ संयम पाळून आहे. आणि शांतपणे खेळतोय..”
आदर्श पुढे म्हणतो.. हा video viral होतोय आणि तसाच viral होत माझ्यापर्यंत पोहोचला आणि अनेक वेळा मित्रांनी share केला.. भाऊ म्हणून वाईट वाटलं की असा खेळ होऊ नये. ही कुस्ती नव्हे. सगळ्यांना तो tough स्पर्धक वाटतोय म्हणुन असा भंगार खेळ खेळला जाऊ नये. काही लोक याचं चुकिचं राजकारण fake accounts द्वारे social media वर करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे याचं राजकारण करु नका एवढीच विनंती. उत्कर्ष बरा आहे. बघुया शनिवारी आणि रवीवारी काय होतय..🙏