नमस्कार,
दूरदर्शनवर अनेक मालिका प्रदर्शित होतात, काही मालिकांना खूप कमी वेळात जास्त प्रसिद्ध मिळते. त्यातील कलाकार सुद्धा खूप प्रसिद्ध होतात. कलाकारांच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षक वर्ग भावूक होऊन जातो. ते स्वतः मेहनत करून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात. काही कलाकारांच्या रक्तातच अभिनयाचे कौशल्य असते. आज आपण जाणून घेऊया एका अभिनेत्याबद्दल..
स्टार प्रवाह वर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे ‘रंग माझा वेगळा’ होय. ‘आशुतोष गोखले’ हा या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. तो एक डॉक्टर चे पात्र साकारत असून एक आदर्श मुलगा, भाऊ, मित्र तसेच नवरा ही सर्व विशेषण जुळणारी भूमिका पार पाडत आहे. त्याने साकारलेल्या या भूमिकेतील अभिनय प्रेक्षकांना खूप आवडत आहे. या मालिकेआधी आशुतोषने झी मराठी वरील ‘तुला पाहते रे’ या मालिकेत जयदीप सरंजामे याची भूमिका साकारली होती. लाडात वाढलेला, रागीट, विक्षिप्त परंतु स्वत:ची अक्कल न वापरणाऱ्या जयदीप ने सुबोध भावे च्या लहान भावाची भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली होती. या मालिकेमुळे तो अधिकच प्रसिद्ध झाला.
‘आशुतोष विजय गोखले’ अस संपूर्ण नाव असणारा हा आशुतोष सुप्रसिद्ध अभिनेता ‘विजय गोखले’ यांचा मुलगा आहे. होय हे खरं आहे. फक्त मराठीच नव्हे तर अनेक हिंदी सिनेमांमध्ये सुद्धा विजय गोखले यांनी काम केले आहे. विजय यांनी दिग्दर्शकाचे सुद्धा काम केले आहे. थोडक्यात काय रक्तातच अभिनयाचे कौशल्य भिनलेल्या आशुतोष ने कुमारवयात अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकले. बत्तीशी नामक एकांकिका मध्ये आशुतोषने काम केले होते. या एकांकिकेला स्पर्धेमध्ये पारितोषिक सुद्धा मिळाले होते. तसेच पुढे काही मराठी नाटकांमध्ये मराठी रंगभूमीवर येतं आशुतोष ने उत्कृष्ट काम केले. तसेच भाऊचा धक्का, डोन्ट वरी बी हॅपी, ओ वूमनिया यामध्ये अभिनेता भरत जाधव यांच्यासोबत काम केले आहे.
![ashutosh gokhale with father vijay gokhale family](https://kalakar.info/wp-content/uploads/2021/07/ashutosh-gokhale-with-father-vijay-gokhale-family.jpg)
‘दम असेल तर’ आणि ‘भरत आला परत’ या चित्रपटात काम केले. आशुतोष ने आपले वडील विजय गोखले सोबत ‘दम असेल तर’ या चित्रपटात काम केले. आशुतोष गोखलेला त्याच्या जीवनात असेच यश मिळत राहो. त्याला पावलोपावली संधी मिळू दे. अशीच प्रगती होत राहो. आशुतोषला त्याच्या भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा…! तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला. अश्याच मनोरंजनात्मक लेखासाठी लाईक करत रहा. हा लेख कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा. हा लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करत रहा. धन्यवाद…