द कश्मीर फाईल्स चित्रपटाच्या भरगोस यशानंतर विवेक अग्निहोत्री व्हॅक्सीन वॉर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. येत्या २८ सप्टेंबर २०२३ रोजी व्हॅक्सीन वॉर चित्रपट प्रदर्शित होत आहे. चित्रपटात पल्लवी जोशी, अनुपम खेर, नाना पाटेकर, गिरीजा ओक, रायमा सेन, रणदीप आर्य यासारखे कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने सर्व टीमने मीडियाशी संवाद साधला. यावेळी नाना पाटेकर यांनी घराणेशाहिवर आपले मत व्यक्त केले. एखादा कलाकार त्याच्या मुलाला सुद्धा अभिनय क्षेत्रात आणतो तेव्हा त्याची क्षमता नसेल तरी या गोष्टी प्रेक्षकांवर बळजबरीने थोपवल्या जातात.
एक दोन चित्रपटानंतर टीका होऊनही ते या सृष्टीत स्थिरस्थावर होतात. पुढे नाना पाटेकर आताच्या चित्रपटांबद्दल आपले मत असे मांडतात की, नुकताच मी एक चित्रपट पाहिला जो मी पूर्ण पाहू शकलो नाही. लोकं सांगतात की चित्रपट खूप चालला. आता तो चित्रपट चालतो म्हणजे त्यात तुम्हाला त्याच त्याच गोष्टी दाखवल्या जातात. ते तुम्हाला असे चित्रपट पाहायला भाग पडतात. एका पत्रकाराने नाना पाटेकर यांना एक असा प्रश्न विचारला तो ऐकून नाना पाटेकर मंचावरून उठून निघू लागले. नाना पाटेकर गेली पाच सहा वर्षे झाली हिंदी चित्रपटात दिसत नाहीत. आताचा वेलकम ३ चित्रपटाचा टिझर लॉन्च झाला यात तुम्ही का नव्हते? असा प्रश्न विचारताच नाना मध्येच थांबतात आणि उत्तर देताना म्हणतात की, त्यांना वाटतं की मी आता जुनाट झालोय.
ह्यांना नाही वाटत मी जुना आहे म्हणून त्यांनी मला त्यांच्या चित्रपटात घेतलं. तुम्ही जर चांगलं काम करत असाल तर तुमच्यासाठी इंडस्ट्री कधीच बंद होत नाही. लोकं येतात, तुम्हाला विचारतात. तुम्ही ठरवायचंय की तुम्ही हे करू शकता की नाही. मी प्रत्येक चित्रपटावेळी असे समजतो की हा माझा पहिला चान्स आहे आणि शेवटचा चान्स आहे. त्यामुळे मी प्रत्येक भूमिकेसाठी तेवढीच मेहनत घेत असतो. दरम्यान वेलकम ३ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. यात अक्षय कुमार, श्रेयस तळपदे, रविना टंडन सारखे बरेचसे कलाकार दिसले. मात्र मजनु भाई आणि उदय शेट्टी हे दोन महत्वाचे पात्रच नसल्याने प्रेक्षकांनी चित्रपटावर नाराजी दर्शवली. एवढी मोठी स्टार कास्ट घेण्यापेक्षा हे दोन महत्वाचे कलाकार घ्यायला हवे होते असे चित्रपटाबाबत बोलले जात आहे.