ठरलं तर मग या मालिकेने जुई गडकरी हिला मोठी प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्यामुळे जुईचा फॅन फॉलोअर्स आता चांगलाच वाढू लागला आहे. जुईच्या आयुष्यात अनेक चढउतार आले मात्र यावर तिने यशस्वीपणे मात केलेली पाहायला मिळते. काही वर्षांपूर्वी जुईने तिच्या गंभीर स्वरूपाच्या आजाराबद्दल खुलासा केला होता. या आजारामुळे जुई पूर्णपणे खचून गेली होती. मानसिक तणाव आणि आजारपणाला औषधांशिवाय कशी मात करायची हे ती मागील काळात शिकली.

आजारातून पूर्णपणे बरी झालेली नसली तरी एक सकारात्मक दृष्टिकोन घेऊन ती आता आपला प्रवास सुखकर करत आहे. जुई खऱ्या आयुष्यात कशी आहे हे मालिकेच्या सेटवरून अनेकदा पाहायला मिळते. जुईचं एक स्वप्न आहे की मराठमोळं जेवण भारताबाहेर देखील मिळायला हवं. यासाठी तिला मराठमोळं जेवण देणारी हॉटेल्सची चेन जगभर पसरवण्याची इच्छा आहे. जुईला जास्त बडबड करायला आवडत नाही, पण ती प्रचंड फुडी आहे. मागील काही वर्षात जुईने बरेचसे केक बेक करून विकले होते. तिला स्ट्रीट फूड आणि थाळी जेवण खायला खूप आवडतं. पुण्यातील वैशाली आणि दुर्वांकुर अशा बऱ्याचशा हॉटेलमध्ये जुई जेवणाचा आस्वाद घेत असते.

पण वडापाव बद्दल जुईचं एक स्पष्ट मत आहे. जुई मूळची कर्जतची. खरा वडापाव फक्त कर्जतमध्येच मिळतो आणि दुसरीकडे जे मिळतात त्याचं नाव फक्त वडापाव असतं असं तिचं स्पष्ट मत आहे. जुईचं आजारपण तिने तिच्या एका पोस्टमध्ये उलगडले होते. मी खूप लकी आहे कारण माझ्या डोक्यावर देवाचा हात आहे आणि म्हणूनच मी या आजारपणातून बाहेर पडले असे ती सांगते. मागील काही वर्ष मी पॉजिटीव्ह गोष्टी घेतल्या, व्हेगन झाले. माझ्याकडे आठ मांजरी आहेत त्यांचे बाळंतपण मी केले. या गोष्टी मला आजारातून औषधांशिवाय बरं करण्यासाठी कामी आल्या असे ती सांगते.
PANVELA YA AANI KOTHARKARNCHA VADAPAV KHAUN BAGHA