Breaking News
Home / मराठी तडका / श्रेयस तळपदेच्या रिअल लाईफ परीबद्दल माहित आहे का?
sheyash talpade and dipti
sheyash talpade and dipti

श्रेयस तळपदेच्या रिअल लाईफ परीबद्दल माहित आहे का?

माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतून श्रेयस तळपदे तब्बल १७ वर्षांनी मराठी सृष्टीकडे वळला आहे. या मालिकेत तो यशच्या प्रभावी भूमिकेत दिसत आहे. यश आणि नेहाची जुळून आलेली केमिस्ट्री आणि त्यात असलेली निरागस परी मालिकेच्या पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. आज डॉटर्स डे चे औचित्य साधून श्रेयस तळपदेने त्याच्या रिअल लाईफ परीचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

sheyash talpade and dipti
sheyash talpade and dipti

श्रेयस तळपदे चित्रपट आणि मालिकेतून काम करत असतानाच मानसोपचार तज्ञ असलेल्या दिप्तीच्या प्रेमात पडला आणि २००४ साली दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. श्रेयस आणि दीप्ती यांच्या लग्नाला बरीच वर्षे उलटून गेली तरी त्यांना अपत्य झाले नव्हते. शेवटी दोघांच्या सहमतीने सरोगेसी द्वारे त्यांनी मुलीला जन्म देण्याचे ठरवले. लग्नानंतर साधारण १४ वर्षांनी त्यांच्या घरी चिमुकलीचे आगमन झाले. ४ मे २०१८ रोजी “आद्याचा” जन्म झाला त्यावेळी दोघांचाही आनंद गगनात मावेनासा झाला होता. आद्या आता साडेतीन वर्षांची झाली आहे आणि ती खूपच क्युट दिसत आहे. श्रेयसला माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून परीसोबत काम करताना लाडक्या लेकीचीच मदत मिळाली आहे तिच्याचमुळे मालिकेतील परिसोबतची त्याची अगदी छान गट्टी जमली आहे, असे तो एका मुलाखतीत म्हणाला होता.

sheyash and dipti talpade daughter aadya
sheyash and dipti talpade daughter aadya

गोलमाल ३, गोलमाल रिटर्न्स, गोलमाल अगेन, इकबाल, डोर, हाऊसफुल्ल २, ओम शांती ओम यासारख्या गाजलेल्या बॉलिवूड चित्रपटातून महत्वाच्या भूमिका निभावल्या आहेत. मधल्या काळात त्याने पोश्टर बॉईज या मराठी चित्रपटाची निर्मिती केली होती. तर पोस्टर बॉईज या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन त्याने केले होते. एक उत्कृष्ट अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिन्ही भूमिकेत त्याला प्रेक्षकांनी नेहमीच स्वीकारले आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील त्याने साकारलेली यशची भूमिका आणि प्रार्थना बेहेरे हिची नॅचरल ऍक्टिंग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे, बालकलाकार मायरा हीचा निरागस अभिनयही खूप चर्चेत आहे. मालिकेतील सर्वच पात्र त्यांच्या सुरेख अभिनयाने मालिका यशस्वी करण्यास सक्षम ठरली आहेत.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.