विशाल निकम हा मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनचा विजेता ठरला. विजयाची ट्रॉफी जिंकल्यानंतर विशालच्या गावी गावकऱ्यांनी त्याचं जल्लोषात स्वागत केलं होतं. मी बिग बॉसचा शो जिंकल्यानंतर माझ्या आई वडिलांना खूप आनंद झाला. त्यांनी माझं खूप कौतुक केलं माझे आईवडील एकदम साधे आहेत .त्यांना आता माझ्यामुळे भरपूर फोन येऊ लागले आहेत, त्यामुळे ते सेलिब्रिटीच झाले आहेत. माझे आईवडील माझं गाव लोकांपर्यंत पोहोचलं आहे, त्यामुळे मी भरपूर खुश आहे. असं विशालने त्याच्या आई वडिलांच्या प्रतिक्रियेबद्दल भावना व्यक्त केली आहे.

बिग बॉसच्या घरात मी पहिल्यांदा पाऊल टाकलं त्याचवेळी मी ठरवलं होतं की हा शो आपण जिंकायचा. माझ्या नावाची पाटी देखील मी पहिल्याच नंबरवर लावली होती, असं विशाल म्हणतो. सौंदर्याबद्दल देखील मीडियाशी बोलताना विशालने खुलासा केला की, पहिल्या पासूनच मी ज्या मुलीवर प्रेम करतोय त्या मुलीची मी वाट पाहतोय. बिग बॉसमध्ये आम्ही तिचं नामकरण वेगळ्या पद्धतीने केलं सौंदर्या म्हणून, सौंदर्याची प्रेमकहाणी ही आतून आली. मला सौंदर्याचा फोनही आला आणि अभिनंदनाचा मेसेजही आला. माऊलींकडे ज्योतिबाकडे मी प्रार्थना करतोय की आमच्यात ज्या गोष्टी बिघडल्या होत्या त्या सॉर्ट व्हाव्यात. सौंदर्याचं खरं नाव काय आहे हे तुम्हाला मी लवकरच सांगेन, पण त्याअगोदर मी तिची भेट घेणार आहे. आमच्यात काही वाद झाले होते, पण मी बिग बॉसच्या घरात राहून खूप चांगला वागत होतो हे तिने पहिलेच आहे.

त्यामुळे आमच्यातला दुरावा कमी व्हावा, आणि तिचं माझ्याबद्दल काय मत आहे हे मला जाणून घ्यायचं आहे. त्यानंतर सौंदर्या कोण आहे ते नक्की सगळ्यांना सांगेन. असा खुलासा विशालने सौंदर्याबद्दल केला आहे. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यावर विशालने पहिलं कोणाला भेटेन हे सांगितलं होतं. त्यानुसार नुकतीच विशालने शिवलीला पाटील यांची भेट घेतली आहे. ‘बिग बॉसच्या घरामध्ये मी बोललो होतो, पहिलं जर कोणाला भेटीन तर शिवलीला ह्यांना. आणि आज आमची भेट झाली ती सुद्धा मार्गशीर्ष महिन्यात. माऊलींच्या पंढरपुरात! ही भेट माऊलींनीच घडवून आणली असावी!’ असे म्हणून विशालने शिवलीला पाटील यांच्या सोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे.
