Breaking News
Home / मराठी तडका / ​’हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात’..​ सोनालीची ही प्रतिक्रिया पाहून सगळे झाले लोटपोट
sonali kulkarni pandu movie bhau kadam
sonali kulkarni pandu movie bhau kadam

​’हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात’..​ सोनालीची ही प्रतिक्रिया पाहून सगळे झाले लोटपोट

​कुशल बद्रिके आणि भाऊ कदम यांनी अभिनित केलेला पांडू हा चित्रपट तुफान लोकप्रियता मिळवताना दिसला आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी मुख्य भूमिकेत पाहायला मिळाली. भाऊ कदम आणि सोनालीवर चित्रित झालेली गाणी सध्या सोशल मीडियावर देखील हिट झाली आहेत. या गाण्यांवर​​ अनेकांनी रील बनवलेले व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यामुळे पांडू हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. अगदी चौथ्या आठवड्यात देखील या चित्रपटाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असल्याने​,​ महाराष्ट्रातील काही चित्रपटगृह प्रेक्षकांनी हाऊसफुल्ल केलेले पाहायला मिळत आहेत.

sonali kulkarni pandu movie bhau kadam
sonali kulkarni pandu movie bhau kadam

चित्रपटातली​​ गाणी देखील प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलेली दिसून येतात.​ ​कुशल बद्रिके चित्रपटाच्या शूटिंगवेळी घडलेल्या गमतीजमती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसतो. नुकतेच त्याने सोनाली सोबत एक व्हिडिओ काढला आहे​,​ त्यात पांडू चित्रपटाचे दिग्दर्शक​ विजू माने देखील समोर बसलेले असतात. सोनाली ह्या व्हिडिओत म्हणते की, ‘बरं झालं की हे मला चित्रपट संपल्यानंतर कळलं, त्यांना मी डिरेक्टर म्हणून सिरियसली घेऊच शकले नसते.​ हे केवढे रामदास पाध्ये सारखे दिसतात.’ सोनालीच्या या खुलास्यावर विजू माने आणि उपस्थित असलेले सर्वचजण खळखळून हसायला लागतात. ‘एखादा इमोशनल सिन त्यांनी करून दाखवला असता​,​ तर मी फक्त हसले असते रे त्यांच्या तोंडावर.’ असं सोनाली म्हणताच विजू कदम अंगावरील जॅकेट काढून कुशल बद्रिकेकडे फेकतात.

bhau kadam kushal badrike director viju mane
bhau kadam kushal badrike director viju mane

त्यानंतर सोनाली आणि कुशल बद्रिके हसू लागतात. कुशल बद्रिकेने शेअर केलेल्या या व्हिडिओला चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.​ ​असाच आणखी एक किस्सा कुशलने याअगोदर देखील सांगितला होता. कुशल आणि भाऊ कदम एकत्र केस कापायला जात होते त्यावेळी भाऊ कदमने त्याचे केस कापून झाले म्हणून​ कुशलचे केस कापतानाचा एक फोटो काढला. नशीब! हे फक्त फोटोवर निभावलं नाहीतर भाऊने माझा केसाने गळा कापला असता​,​ अशी एक मजेशीर पोस्ट शेअर केली होती. पांडू चित्रपटामुळे कुशल बद्रिके, भाऊ कदम, विजू माने, सोनाली कुलकर्णी या सर्वांचेच बॉंडिंग छान जुळून आले आहे​.​ त्यामुळे एकमेकांची थट्टा मस्करी करत सेटवरचं वातावरण हलकंफुलकं ठेवायला मदत होते. चित्रपटातील कलाकारांमधल्या घडत असलेल्या ह्या गमतीजमती ऐकून प्रेक्षकांना देखील आपले हसू आवरत नाही हे विशेष.

About Priyanka Joshi

प्रियंका तंत्रज्ञान, डिझाइनर आणि पुण्यातील लेखिका आहे. प्रोफेशनल आणि वाचकांना आवडणारी वेबसाइट बनविण्यात तिचा हातखंडा आहे. परदर्शी न्यूज मधील हरहुन्नरी सहकाऱ्यांसोबत काम करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.